बूंदी, 28 मार्च : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत. हत्या, आत्महत्या, तसेच प्रेम प्रकरणातून खुनाच्याही धक्कादायक घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षकाला समाजात आदराचे स्थान असते. मात्र, याच शिक्षकाने एका विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण -
राजस्थानमधील बुंदी जिल्ह्यातील दबलाना पोलीस स्टेशन परिसरात पोलिसांनी शाळकरी मुलीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अखेर पकडले आहे. सुमारे साडेपाच महिन्यांपूर्वी आरोपी शिक्षकाने त्याच्याच शाळेतील बारावीच्या विद्यार्थिनीसोबत घाणेरडे कृत्य केले होते. यानंतर पीडितेने तक्रार घेऊन पोलीस ठाणे गाठले असता तो पळून गेला. आरोपीच्या अटकेच्या मागणीसाठी पीडितेच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून दिवसभर ठिय्या आंदोलनही केले.
हे प्रकरण दबलानातील एका शाळेशी संबंधित आहे. गेल्या वर्षी 14 ऑक्टोबर या शाळेत शिकणाऱ्या बारावीच्या विद्यार्थिनीने भूगोल शिक्षक अनिल नागर याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. टीचर नागर याने तिला वेगळ्या खोलीत बोलावले. नंतर कपडे काढण्यास सांगून तिचा विनयभंग केला. यामुळे ती घाबरली आणि कशीतरी तेथून पळून गेली, असा आरोप पीडितेने केला आहे.
एकाशी लग्न, दुसऱ्यासोबत अफेअर, आणि तिसऱ्याशी...., महिलेची निर्घृण हत्या
पीडितेने घरी येऊन कुटुंबीयांना याची माहिती दिली. त्यानंतर पीडित विद्यार्थिनीने तिच्या कुटुंबीयांसह दबलाना पोलीस ठाणे गाठून शिक्षक अनिल नागर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर अनिल नगर फरार झाला असून त्याचा शोध पोलिसांना लागला नाही. तेव्हापासून पोलीस अनिल नागरचा शोध घेत होते. मात्र, त्याचा कोणताही सुगावा लागला नाही. आरोपीला अटक न केल्याने आरोपीचे कुटुंबीय संतप्त झाले होते.
पोलिसांच्या हलगर्जीपणाबाबत त्यांनी एक दिवस बुंदी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करून ठिय्या आंदोलनही केले. अखेर दबलाना पोलिसांनी त्याचा शोध घेत आरोपी शिक्षक अनिल नागरला रविवारी अटक केली. पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Local18, Rajasthan