नारायण काळे, प्रतिनिधी जालना, 22 फेब्रुवारी : पर्यटन हा देशातील सर्वात वेगाने वाढणारा उद्योग आहे. लोकांना रोजगार देण्याची क्षमता असणारा हा उद्योग कोरोनानंतर वाढीस लागला आहे. कृषी पर्यटन ही नवीन संकल्पना देखील आता रुजू होत आहे. याच कृषी पर्यटनाच्या संकल्पनेला जालन्यातील एकनाथ मुळे यांनी मूर्त रूप दिलं आहे. पेशाने शिक्षक असलेल्या एकनाथ मुळे यांनी आपल्या शेतावर कृषी पर्यटन ही संकल्पना देखील साकार करून दाखवली आहे. काय आहे विशेष? जालना शहरापासून केवळ 10 किमी अंतरावर जालना मंठा रस्त्यावर सिंधी काळेगाव हे गाव आहे. येथील आपल्या शेतात एकनाथ मुळे यांनी कुसुम अॅग्री टुरिझम सुरू केलं आहे. शेतात भटकंती, वेगवेगळ्या पिकांची ओळख, सेल्फी पॉइंट, झोपाळा, हॉर्स रायडिंग, बोट रायडिंग, बैलगाडा सफर, हुरडा पार्टी यासारख्या भन्नाट गोष्टी इथे तुम्हाला अनुभवायला मिळणार आहेत. कुसूम अॅग्री टुरिझममध्ये तुम्हाला कुसुम नर्सरी मध्ये वेगवेगळी रोपे खरेदी करता येतील.
Nashik : शहरापासून दूर झोपडीमध्ये का राहतोय उच्चशिक्षित तरूण? पाहा Video
राहण्याची देखील उत्तम सोय मागील दोन वर्षांपासून कुसुम अॅग्री टुरिझम लोकांच्या सेवेमध्ये दाखल झाले आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे धावपळीच्या जीवनात लोकांना दोन क्षण विरंगुळा व्हावा. तसेच नवनवीन पिके यांची ओळख व्हावी हा आहे. यामध्ये आम्ही राहण्याची देखील उत्तम सोय केलेली आहे. लहान मुलांसाठी पार्क, ब्रेक डान्स आहे. नुकतेच आम्ही नौका विहार ही संकल्पना सुरू केली आहे, असं कुसुम अॅग्री टुरिझम संचालक एकनाथ मुळे यांनी सांगितले.
शेतकऱ्याचा नादच खुळा! दुष्काळी परस्थितीवर मात करण्यासाठी 2 एकरात बनवले शेततळे, Video
अनेक गोष्टी समाविष्ट होणार
वीकेंडला निसर्गरम्य वातारणात वेळ घालवण्यासाठी होम स्टे यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर हे तुम्हाला आरोग्यदायी मिळणार आहे. सध्या अनेक कामे प्रगतीपथावर असून या उपक्रमात अनेक गोष्टी समाविष्ट होणार आहेत.