तरुणाचा अजय देवगण यांना सवाल
मुजीब शेख, प्रतिनिधी नांदेड, 25 जून : सध्या सोशल मीडियावर जंगली रम्मी खेळाच्या क्षणोक्षणी जाहिराती येत आहेत. अनेक प्रसिद्ध अभिनेते या जुगार ॲपच्या जाहिराती करतात.. जंगली रम्मिची जाहिरात करणाऱ्या अभिनेता अजय देवगण याला नांदेडच्या एका तरुणाने पत्र पाठवले. हं पत्र पाठवत त्याने थेट अभिनेते अजय देवगण यांना प्रश्न विचारला आहे. काय आहे पत्रात - विशाल शिंदे, असे या युवकाचे नाव आहे. जंगली रम्मी खेळून तुम्ही किती पैसे जिंकलात, असा प्रश्न या पत्राद्वारे या तरूणाने अजय देवगण याला विचारला आहे. नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे विशाल शिंदे ऑटोमोबाईलच दुकान चालवतो. बेरोजगारीमुळे तरुणांच्या हाताला काम नाही. त्यात अशा जाहिराती पाहून पैशाच्या आमिषाने अनेक तरुण जंगली रम्म्मीच्या नादाला लागले आहेत.
तरुणाने अजय देवगण यांना लिहिलेले पत्र
या सर्व जुगारामुळे अनेकजण कर्जबाजारी झाले आहेत. त्यामुळे मी अजय देवगण यांना पत्र लिहिले आहे, असे विशाल शिंदे म्हणाला. फक्त जाहिरात करुन लोकांना नादी न लावता अजय देवगण यांनी जंगली रम्म्मी खेळून किती पैसे जिंकले हे देखील जाहीर करावे, असा उल्लेख विशालने अजय देवगण यांना लिहिलेल्या या पत्रात केला आहे.