प्रमोद पाटील(मुंबई)15 फेब्रुवारी : फळांचा राजा म्हणून ओळख असलेला आंबा आता हळूहळू बाजारात येऊ लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत आंबा यंदा 1 महिला लवकर आल्याचे बोलले जात आहे. दरम्यान राज्याची राजधानी असलेल्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल (दि.14) तब्बल 479 पेट्या हापूसची आवक झाल्याची माहिती देण्यात आली. फेब्रुवारीत पहिल्यांदाच एवढी आवक झाली असल्यामुळे बाजार पेठ आंब्यानी भरल्याने उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. होलसेल मार्केटमध्ये ४ ते ७ डझनच्या पेटीला 3 हजार 500 ते 8 हजार रुपये भाव असल्याची माहिती देण्यात आली.
मुंबईतील APMC बाजारात आंब्याची आवक वाढली असून, मागील दोन दिवसात जवळपास हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. थंडीचा कडाका आसल्याने आंब्यावर याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. मात्र आता थंडी काही प्रमाणात कमी झाल्याने आंबा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे. हीच आवक पुढील महिन्यापासून दुप्पट राहणार असल्याची माहिती बाजार समिती व्यवस्थापनेकडून देण्यात आली.
हे ही वाचा : Beed: पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video
दरम्यान मार्केटमध्ये दिवसाला चारशेपर्यंत पेट्या येत आहेत, हा आकडा पुढील महिन्यात हजारांच्यावर जाण्याची शक्यता आहे. आता आंब्याच्या गुणवत्तेप्रमाणे पेटीला भाव मिळत असून यात साधारण आंबा जास्तीत जास्त दोन हजारांचा दर एका पेटीला मिळत आहे. तर हाच उत्तम गुणवत्ता असलेल्या आंब्याच्या एका पेटीला दहा हजारांचा दर मिळत आहे. पुढील महिन्यात आवक वाढल्याने दर कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी याबाबत माहिती दिली.
एका महिन्याच्या उशिरानंतर शेवटी आंबा आला. परवडणारे दर सुरुवातीलाच आसल्याने खवय्ये खुश आहेत, त्यात आंब्याची गुणवत्ता चांगली आहे. एका पेटीला दोन हजार तर चांगल्या आंब्याला दहा हजारांचा दर आहे. पुढील महिन्यात आवक वाढून दर खाली येतील अशी आशा व्यक्त करण्यात आली.
बाळासाहेब भेंडे आंबा व्यापारी म्हणाले की, यावर्षी कोकणात आंब्याच्या पिकाला बहर चांगला आला आहे. यामुळे आंबा सामान्यांना परवडेल अशा भावात विकला जाणार आहे. गतवर्षी एप्रिलमध्ये मोठ्या प्रमाणात आवक झाली होती. परंतु, यावर्षी मार्चमध्येच मुबलक आंबा उपलब्ध होण्याची शक्यता आहे. यंदा थंडीही मोठ्या प्रमाणात असल्याने आंब्याला चांगला मोहोर आला होता. त्यामुळे मार्चपासून मोठ्या प्रमाणात आंबा मुंबईच्या बाजारपेठेत दाखल होईल, असा विक्रेत्यांचा अंदाज आहे. त्यामुळे
हे ही वाचा : Beed News: ज्वारी काढणीच्या हंगामात शेतकऱ्यांपुढं गंभीर प्रश्न! कशी सुटणार अडचण? Video
यावर्षी आंबा पीक चांगले आहे. हंगाम लवकर सुरू झाला असून मार्चमध्ये आवक भरपूर होऊन आंबा सामान्य नागरिकांच्या आवाक्यात येईल. मागील काही दिवसांपासून कोकणातून हापूसची काही प्रमाणात आवक होत आहे. फेब्रुवारीमधील आतापर्यंतची सर्वाधिक आवक काल झाली आहे. आंब्याच्या दर्जाप्रमाणे 4 ते 7 डझनच्या पेटीला मार्केटमध्ये 3 हजार 500 ते 8 हजार रुपयांचा दर मिळत आहे.