राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना सुनावलं
मुंबई, 14 जानेवारी : आज मनसेप्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे. राज्यभरात मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दरम्यान राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं मंगळवारी मध्यरात्रीच शिवतीर्थाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी गर्दी गेली होती. मात्र उत्साहाच्या भरात घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. जास्त आरडाओरडा करू नका, माझा नातू आजारी आहे म्हणत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सुनावलं. त्यानंतर कार्यकर्ते देखील शांत झाले. नेमकं काय घडलं? आज राज ठाकरे यांचा वाढदिवस आहे, राज ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मध्यरात्रीच शिवतीर्थबाहेर गर्दी केली होती. मात्र घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे यांनी सुनावलं आहे. आवाज करू नका, जास्त आरडाओरडा करू नका. माझा नातू आजारी आहे आणि तो झोपला आहे, असं राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना म्हटलं. त्यानंतर कार्यकर्ते देखील शांत झाले. राज ठाकरे यांनी काल रात्री उत्तर मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला.
दरम्यान दुसरीकडे राज्यभरात आज मनसे कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात येत आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.