JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ग्लोबल टिचर अवार्ड मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजींची आणखी एक अचिव्हमेंट

ग्लोबल टिचर अवार्ड मिळवणारे रणजितसिंह डिसले गुरुजींची आणखी एक अचिव्हमेंट

सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना शैक्षणीक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर देशातून नाही तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सोलापूर, 20 डिसेंबर: युनेस्को व लंडन येथे कार्यरत असलेल्या वार्की फाउंडेशनद्वारा ‘ग्लोबल टीचर प्राईज’ अवार्ड विजेते रणजितसिंह डिसले (Global Teacher Award Winner Ranjitsingh disley)यांनी आणखी एक अचिव्हमेंट केली आहे. ती म्हणजे डिसले गुरुजींनी कोरोनावरही (Coronavirus) विजय मिळवला आहे. रणजितसिंह डिसले शैक्षणीक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्राप्त केल्यानंतर ते अनेकांच्या संपर्कात आले होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, राज्यपाल यांच्यासह राज ठाकरे यांनी डिसले गुरुजींचा मुंबईत सन्मान केला होता. हेही वाचा.. जयंत पाटलांचं आगळंवेगळं फोटोसेशन, चिमुकल्याच्या आग्रहाखातर दिली अशी पोझ! मुंबईहून गावी परतल्यानंतर ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. नंतर त्यांनी बार्शी येथील डॉ. संजय अंधारे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन कोरोनावर मात केली. कोरोनामुक्त झाल्यानंतर डॉक्टरांनी केला डिसले गुरुजींचा सन्मान केला. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना शैक्षणीक क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मिळाला. त्यांच्या या कर्तृत्वामुळे त्यांच्यावर देशातून नाही तर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. देवदूतांचे मनापासून आभार, डिसले गुरुजींची फेसबूक पोस्ट ‘ग्लोबल टीचर प्राईझ मिळाल्याचा आनंद साजरा करीत असतानाच कोरोनाग्रस्त झालो. मात्र योग्य वेळी निदान झाल्याने उपचार लवकर सुरू झाले आणि परिस्थिती लवकरच आटोक्यात आली . बार्शीचे सुप्रसिद्ध डॉक्टर संजय अंधारे सर आणि सुश्रुत हॉस्पिटलचे सर्व देवदूत यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेऊन कोरोनावर मात केली, याचा आनंद आहे, असं डिसले गुरुजींनी म्हटलं आहे.

मागील 10 दिवस अंधारे सर आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेले परिश्रम यामुळे आज मी कोरोनामुक्त झालो आहे, याचा आनंद आहे. अर्थात लढाई अजून संपलेली नाही आहे. आपण सर्वांनी दिलेल्या सदिच्छा, प्रेम आणि डॉ.संजय अंधारे सरांनी केलेले उपचारामुळे अर्धी लढाई जिंकली आहे. हेही वाचा… मुंबईकरांनी आधीच खूप भोगलंय, आणखी त्रास नको; देवेंद्र फडणवीसांनी जोडले हात सुश्रुत हॉस्पिटलच्या सर्वच देवदूतांचे मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो. आणि सर्वांना एकच आवाहन करतो, की लक्षणे दिसू लागताच डॉक्टरांशी संपर्क साधा, लगेच टेस्ट करून घ्या, लवकर निदान आणि वेळेवर उपचार हीच कोरोनावर मात करण्याची युक्ती आहे, असंही रणजितसिंह डिसले गुरुजी यांनी आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या