JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / BJP Shivsena : सापत्न वागणुकीवरून गजानन कीर्तिकरांचं घुमजाव, भाजपबद्दल आता म्हणतात...

BJP Shivsena : सापत्न वागणुकीवरून गजानन कीर्तिकरांचं घुमजाव, भाजपबद्दल आता म्हणतात...

भाजप प्रणित एनडीएमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका शिवसेना खासादार गजानन कीर्तिकरांनी केल्यामुळे युतीत सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती.

जाहिरात

गजानन किर्तीकरांचा सापत्न वागणुकीवरून घुमजाव

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 जून : भाजप प्रणित एनडीएमध्ये सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका शिवसेना खासादार गजानन कीर्तिकरांनी केल्यामुळे युतीत सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र आता कीर्तिकरांनी त्या वक्तव्यावर घुमजाव केलाय. आपण असं कोणतही वक्तव्य केलं नसल्याची सारवासरव कीर्तिकरांनी केली आहे. भाजपकडून केंद्रात सापत्न वागणूक मिळत असल्याची टीका गेल्या आठवड्यात कीर्तिकरांनी केली होती. केंद्रातील भाजप प्रणित एनडीएत शिंदेंच्या शिवसेनेचा समावेश आहे. मात्र केंद्रात भाजपकडून घटक पक्षांना सन्मानाची वागणूक मिळत नसल्याचा आरोप गजानन कीर्तिकरांनी केला होता. भाजप आणि शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत सगळं काही अलबेल नसल्याचं समोर आलं होतं. खरं तर राज्यात भाजप- शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेचं सरकार सत्तेत येऊन 11 महिने झाले नाहीत, तोच युतीत वादाला तोंड फुटल्याचं कीर्तिकरांच्या वक्तव्यातून उघड झालं होतं, पण आता कीर्तिकरांनी यावर घुमजाव केलंय. सापत्न वागणूक असं काही मी बोललोच नाही, माझ्या तोंडात ते टाकलं गेलं, असा यूटर्न गजानन किर्तीकर यांनी घेतला आहे. जितेंद्र आव्हाडांच्या अडचणी वाढल्या, सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात गुन्हा दाखल कीर्तिकरांनी घुमजाव केल्यानंतर पुन्हा एकदा राजकीय कलगीतुरा रंगलाय. कीर्तिकरांनी युतीमधील सत्य जनतेसमोर मांडल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेना एनडीएचा घटक पक्ष आहे. मात्र शिवसेनेला अद्यापही केंद्राच्या सत्तेत वाटा काही मिळाला नाही. केंद्रात शिवसेनेला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपदाची अपेक्षा आहे. शिवसेनेच्या एनडीएतील प्रवेशानंतर तशी चर्चाही रंगली होती. आता सर्वच राजकीय पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे. कारण पुढच्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यापूर्वी सत्तेत वाटा मिळावा म्हणून यासाठी शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेकडून हे दबावतंत्र अवलंबलं जात नाही ना? अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार?

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या