उल्हासनगर, 1 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढल्या आहेत. सिंधी समाजाबद्दलच्या वक्तव्याविरोधात जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधी समाजाबद्दल जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेपार्ह विधान केल्याची तक्रार भाजप जिल्हाध्यक्ष जमनू पुरस्वामी यांनी दिली होती, त्यानंतर उल्हासनगर हील लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 27 मे रोजी उल्हासनगरच्या नेताजी चौक परिसरात राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी सिंधी समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. सिंधी समाज आक्रमक दरम्यान जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात ठाण्यातील सिंधी समाजाने एकत्र येत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. ठाण्याच्या कोपरी परिसरात मोठ्या संख्येने सिंधी समाज वास्तव्याला आहे. राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उल्हासनगरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना सिंधी समाजाला उद्देशून आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा सिंधी समाजाचा आरोप आहे. या विरोधात ठाण्यामध्ये वास्तव्याला असलेल्या सिंधी बांधवांनी कोपरीमधील शंकर मंदिरात एकत्र येत जितेंद्र आव्हाडांचा निषेध केला. पुण्याचा तिढा सुटेना, आता आणखी एका जागेवरून महाविकास आघाडीमध्ये सामना होणार? जोपर्यंत जितेंद्र आव्हाड माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांच्या घरावर मोर्चा काढणे, कोपरी बंद ठेवणे, जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन देणे, या संविधानिक मार्गाने निषेध नोंदवण्याचा निर्णय सिंधी समाजाने घेतला आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्यासह कोपरीमधील सिंधी समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. शिरसाटांच्या क्लिन चिटवर अंधारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या राज्याचे गुणी गृहमंत्री…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







