JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / नालासोपाऱ्यात आग, सिलेंडरचा स्फोट अन् 2 जवान जखमी, नेमकं काय घडलं?

नालासोपाऱ्यात आग, सिलेंडरचा स्फोट अन् 2 जवान जखमी, नेमकं काय घडलं?

नालासोपारा येथे लागलेल्या आगीत अग्निशमन दलाचे 2 जवान जखमी झाले.

जाहिरात

नालासोपारा आग

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नालासोपारा, 5 मार्च : नालासोपारा पूर्वेकडील एका ठिकाणी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या आगीत 2 जवान जखमी झाले आहेत. दरम्यान, पीपीई किटमुळे या दोघांचे प्राण वाचले. सुदैवाने या घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला. अंबरनाथ लपासी, यांच्या पंचम पॅलेस, बी. विंग रूम नंबर 207 मध्ये 3 वाजून 39 मिनिटांनी आग लागली. घटनास्थळी तीन वाजून 40 मिनिटांनी गाडी अग्निशमन वाहन रवाना झाले. तीन वाजून 45 मिनिटांनी गाडी घटनास्थळी पोहोचली. यावेळी बिल्डिंगमधील सर्व लोक बाहेर आले होते. अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी पोहोचून फायरमन राहुल पाटील आणि कुणाल तामोरे पाहणी करण्याकरिता रूममध्ये दाखल होताच क्षणी जळत असलेल्या आगीमध्ये असलेला सिलेंडरचा स्फ़ोट झाला. आगीच्या बॅक ड्रॉपमुळे, दोघे होरपळले दोघांनी पीपीई किट असल्याने वाचले. यात राहुल पाटील हे 22 टक्के भाजले असून कुणाल 12 टक्के भाजले आहेत. संदीप देशपांडेंवर हल्ला कुणी केला? पोलिसांनी तपासानंतर दिली धक्कादायक माहिती

त्यांना ओझोन हॉस्पिटल येथे पुढील उपचाराकरिता रवाना करण्यात आले. त्यानंतर उर्वरित कर्मचाऱ्यांनी आगीवर चार वाजून 45 मिनिटांनी नियंत्रण मिळवले आहे. सुदैवाने या घरात कोणी नसल्याने अनर्थ टळला. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांच्या जीवावर आलेलं हातावर निभावले असून सुटकेचा निश्वास सोडला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या