बसचा भीषण अपघात
जळगाव, 28 एप्रिल : एसटीच्या अपघाताचं सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वीच बुलडाण्यामध्ये बसचं ब्रेक फेल होऊन एसटी घाटात कोसळली होती. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक बस अपघाता झाला आहे. एसटी बसचे टायर फुटून ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळली. या घटनेत 8 ते 10 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या बसमधून एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते, अशी माहिती समोर येत आहे. मुक्ताईनगर-कुऱ्हा रस्त्यावर अपघात घटनेबाबत अधिक माहिती अशी की जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर-कुऱ्हा रस्त्यावर हा अपघात झाला आहे. मुक्ताईनगर, काटेलधाम बसचं टायर फुटलं. बसचं टायर फुटल्यानं चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकली. या घटनेत आठ ते दहा प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मोठा अनर्थ टळला मिळत असलेल्या माहितीप्रमाणे या बसमधून एकूण 41 प्रवासी प्रवास करत होते, बसचं टायर फुटून हा अपघात झाला. चालकाच्या सतर्कतेमुळं मोठा अनर्थ टळला आहे. या अपघातामध्ये सात ते आठ लोक किरकोळ जखमी झाले असून, सुदैवानं जिवीतहानी झालेली नाही. दरम्यान बसचा अपघात झाल्यामुळे हे प्रवासी गेल्या दोन तासांपासून रस्त्याच्या कडेला तसेच ताटकळत उभे आहेत.