JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Eknath Khadse : फडणवीसांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, म्हणून मला दहा-बारा खाती दिली

Eknath Khadse : फडणवीसांच्या आरोपानंतर एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, म्हणून मला दहा-बारा खाती दिली

Eknath Khadse : एकनाथ खडसे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावर एकनाथ खडसे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

जाहिरात

एकनाथ खडसे यांचा गौप्यस्फोट

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

जळगाव, 7 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यापासून भाजप आणि खडसे यांच्यामध्ये आरोपी प्रत्यारोपांच्या मालिका सुरुच आहे. नुकतेच भाजपने एकनाथ खडसे यांना अनेक महत्त्वाची खाते दिली होती. मात्र, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना काय दिलं? त्यामुळे भाजपने मला काहीच दिलं नाही, अशी एकनाथ खडसेंनी भाजपची बदनामी करू नये असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. या वक्तव्यावर प्रत्युत्तर देत मुख्यमंत्रीपदावर मी भाजपला नको होतो म्हणून मला दहा-बारा खाते देण्यात आल्याचा मोठा गोप्यस्फोट केला आहे. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? एकनाथ खडसे भाजपची बदनामी करत असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस म्हणाले, भाजपने एकनाथ खडसे यांना अनेक महत्त्वाची खाते दिली होती. मात्र, राष्ट्रवादीने एकनाथ खडसे यांना काय दिलं? त्यामुळे भाजपने मला काहीच दिलं नाही, अशी एकनाथ खडसे यांनी भाजपची बदनामी करू नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. यावर आता माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा - Kolhapur News : कोल्हापूरच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… काय म्हणाले एकनाथ खडसे? चाळीस वर्ष भाजप पक्षासाठी मी झटलो ज्यांचं भाजपमध्ये योगदान नाही त्यांना देखील चार-पाच खाते दिली जातात. त्यामुळे मला मिळालेले खाते हा माझा अधिकार होता, असे एकनाथ खडसे म्हणाले. दरम्यान मी भाजपची कधी बदनामी केली नसून भाजपवर माझा कधीही रोष नसून ज्या एक-दोन लोकांमुळे भाजप बदनाम होत आहे. त्यांच्यावर माझा रोष असल्याचे म्हणत एकनाथ खडसेंनी देवेंद्र फडणीसांवर निशाणा साधला आहे. चाळीस वर्षे हमाली करून ऐनवेळी माझं तिकीट कापून मला विजनवासात पाठवण्याचा डाव होता. त्यावेळी मला राष्ट्रवादीने एमएलसी देऊन आमदार केलं. म्हणून मी राजकारणात जिवंत असल्याचेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या