JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / ताई, दादा आणि भाऊ! सुप्रिया सुळेंनी अखेर अशी घडवली अजित पवार आणि खडसेंची भेट, पाहा VIDEO

ताई, दादा आणि भाऊ! सुप्रिया सुळेंनी अखेर अशी घडवली अजित पवार आणि खडसेंची भेट, पाहा VIDEO

राष्ट्रवादीतले सगळे दिग्गज नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते, अपवाद फक्त अजित पवार यांचा. पण सुप्रिया सुळे यांच्यामुळे ती राहिलेली भेट घडून आली.. कशी पाहा VIDEO

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 23 ऑक्टोबर : एकनाथ खडसे (Eknath Khadse joins NCP) यांनी अखेर शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केला. राष्ट्रवादीतले सगळे दिग्गज नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते, अपवाद फक्त अजित पवार यांचा. त्यावरून काही माध्यमांनी राजकीय अर्थ काढत तर्कही लढवले, पण शरद पवार यांनीच व्यासपीठावरून अजित पवार यांच्या अनुपस्थितीबद्दल खुलासा केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी नाथाभाऊंशी अजित पवारांची भेटच घालून दिली असल्याचा VIDEO समोर आला आहे. सुप्रिया सुळे, अजित पवार आणि एकनाथ खडसे यांची ही भेट प्रत्यक्ष नसली तरी व्हर्च्युअल होती. त्याचा video news18 कडे आला आहे. अजित पवार एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला आले नाहीत. म्हणजे ते नाराज आहेत, अशा बातम्या माध्यमांतून येऊ लागल्या.  पण पवार यांनी त्याबद्दल खुलासा केला. ‘अजित पवार हे नाराज असण्याचं काहीही कारण नाही. फक्त कोरोनाचं संकट असल्याने काळजी घ्यावी लागते, त्यामुळे ते घरी आहेतट, असं सांगत त्यांनी चर्चेला विराम जेण्याचा प्रयत्न केला. अजितदादांना Covid-19 ची लक्षणं दिसल्याने त्यांनी स्वतःला क्वारंटाइन करून घेतलं आहे. म्हणूनच त्यांनी या कार्यक्रमाला येणं टाळलं. एकनाथ खडसे यांची आजच्या दिवशी अजितदादांशी राहून गेलेली भेट अखेर सुप्रिया सुळे यांनी घडवून आणली. त्यांनी सरळ अजितदादांना VIDEO कॉल करून नाथाभाऊंशी गाठ घालून दिली. या सगळ्याचा व्हीडिओ news18 च्या कडे आला आहे.

संबंधित बातम्या

एकनाथ खडसे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यावर अजित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली होती. अजित पवार म्हणाले, “राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय  एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ, ऊर्जा मिळाली आहे.”

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या