JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बाप्पाच्या विसर्जनाला पाणी नाही म्हणून लातूरकरांचा जगावेगळा उपक्रम, सगळ्या मुर्ती...!

बाप्पाच्या विसर्जनाला पाणी नाही म्हणून लातूरकरांचा जगावेगळा उपक्रम, सगळ्या मुर्ती...!

मुंबई, कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाचं टेन्शन तर तिकडे लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी नद्या-विहिरींना पाणीच नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

विलास बडे, प्रतिनिधी लातूर, 13 सप्टेंबर : दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यात सर्वच जलसाठे पाऊस न पडल्याने कोरडे आहेत. अशात पारंपरिक गणेशोत्सव साजरा करताना गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्याचं मोठं आव्हान इथल्या भाविकांसमोर आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी आवाहन करत होते, त्यामुळे काहींनी शाडू मातीच्या गणपतीची स्थापना केली तर काहींनी बाप्पाच्या छोट्या मूर्त्या बसवल्या. घरच्या घरी पाण्यात मूर्ती बुडवून विसर्जन केलं आणि काही मूर्ती दान केल्या. पण काही मुर्त्या या कुठे विसर्जन करायचा असा प्रश्न निर्माण झाला आहे. काही भाविकांनी बाप्पाच्या मूर्ती जतन करून ठेवल्या. यातच पाणी नसल्याने मनपा, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या वतीने पुढाकार घेऊन सर्व मूर्ती दान करण्याचं लातूरकरांनी ठरवलं. 12 सप्टेंबर रोजी विसर्जन करताना लातूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गणेश मूर्ती पाण्यात विसर्जन न करता त्या मनपा प्रशासनास दान केल्या. हजारो मूर्ती गोळा करून त्या सुरक्षित ठिकाणी ठेवल्या आहेत. दुष्काळामुळे का होईना लातूरकरांनी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी एक पाऊल पुढे जाऊन हा उपक्रम राबवला. लातूरकरांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. हा देशातील एकमेव उपक्रम असेल जो सर्वांनी मोठ्या प्रमाणात हजारो लहान मोठ्या मूर्ती दान केल्या. दान केलेल्या मूर्त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पावसाचा अजब न्याय! राज्यात एकीकडे धुवांधार, तर या ठिकाणी विसर्जनाला पाणीच नाही मुंबई, कोकणात विसर्जनाच्या दिवशी पावसाचं टेन्शन तर तिकडे लातूरमध्ये गणेश विसर्जनासाठी नद्या-विहिरींना पाणीच नाही, अशी विचित्र परिस्थिती सध्या महाराष्ट्रात आहे. गुरुवारच्या अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जनाची तयारी तर सुरू झाली आहे. पण या वर्षी पावसाने राज्यात जरा अन्यायच केला आहे. राज्यात काही ठिकाणी पुराचा धोका असताना दुसरीकडे भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. या वर्षी उशीरा सुरू झालेल्या मान्सूनने जुलैमध्ये चांगलाच जोर धरला. इतर बातम्या - प्रेमाचा आणि नात्याचा खेळखंडोबा, दिराने अल्पवयीन मित्रांसह वहिणीवर केला बलात्कार विशेषतः मुंबई, ठाणे, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात तो धुवांधार कोसळला. कोल्हापूर, सांगली, साताऱ्याला तर पुरानं वेढलं. तिकडे विदर्भातही गडचिरोली पाण्याखाली गेलं. अनेक गावांचा संपर्क तुटण्याएवढी पाण्याची पातळी वाढली. त्याच वेळी मराठवाडा विशेषतः लातूर, बीड, परभणी, वाशीम जिल्हा मात्र तहानलेलाच राहिला. लातूर शहरातली पाण्याची परिस्थिती तर इतकी बिकट आहे की गणेश मूर्तींचं विसर्जन करायलाही पुरेसं पाणी नाही. इतर बातम्या - बिझनेस ट्रिपवर गेलेल्या व्यक्तीचा SEX करताना मृत्यू, कोर्टाकडून धक्कादायक निकाल लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर एक बैठक घेतली आणि मूर्तींचं विसर्जन न करण्याचं आवाहन केलं. गणेश मंडळांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे कित्येक वर्षांत पहिल्यांदाच यंदा लातूरमध्ये गणेश विसर्जन होणार नाही. हा महिना पुरेल एवढाच पाणीसाठा लातूरमध्ये सध्या आहे. नळाने पाणीपुरवठा करण्यासाठी पुरेल एवढंच पाणी आहे. ते अर्थातच पिण्यासाठी वापरण्याला प्राधान्य आहे. विहिरींनाही या वर्षी पाणी नाही. त्यामुळे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गणेश मंडळांनी गणेश मूर्तींचं विसर्जन न करता, मूर्ती तशाच ठेवायचा निर्णय घेतला आहे. इतर बातम्या - या काकूंनी केली ‘गलती से मिस्टेक’, VIDEO होतोय तुफान व्हायरल गणेश मूर्ती दान करा, मूर्तीकारांना परत द्या किंवा विधीवत विसर्जनाची पूजा करून पाण्यात विसर्जित न करता तशीच ठेवा, असं आवाहन करण्यात येत आहे. लातूर शहरात जूनपासून आतापर्यंत फक्त  261.15 मिमी पाऊस झाला आहे. पालघर, ठाणे, मुंबईत एवढा पाऊस तर एकाच दिवशी पडलाय. लातूक जिल्ह्याची सरासरी थोडी अधिक म्हणजे 413.82 मिमी आहे. दुसरीकडे मुंबईत यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत 3345 मिमी पावसाची नोंद झाली आहे. 2350 मिमीपेक्षा ती बरीच जास्त आहे आणि सप्टेंबरमध्येही पावसाची बॅटिंग सुरूच आहे. VIDEO : राज्यात यात्रांचा पूर, बीडमध्ये पिकविम्यासाठी बळीराजा 25 किमी पायी निघाला!

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या