JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Dharashiv News : बंद बोअरमधून अचानक उडाला 50 फूट पाण्याचा फवारा; धाराशिवमधला 'हा' व्हिडीओ पाहिलात का?

Dharashiv News : बंद बोअरमधून अचानक उडाला 50 फूट पाण्याचा फवारा; धाराशिवमधला 'हा' व्हिडीओ पाहिलात का?

धाराशिवमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या बोअरमधून अचानक 50 फूट पाण्याचा फवारा बाहेर आला आहे.

जाहिरात

धाराशिवमध्ये बंद बोअरमधून पन्नास फूट पाण्याचा फवारा

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

धाराशिव, 10 मे, बालाजी निरफळ :  धाराशिवच्या उमरगा तालुक्यातून एक आर्श्चयचकित करणारी घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बंद पडलेल्या बोअरमधून अचानक 50 फूट पाण्याचा फवारा बाहेर आला आहे. विशेष म्हणजे कोणताही विद्युत पुरवठा किंवा मोटर न जोडता हे पाणी बाहेर आल्याचा दावा ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. उमरगा तालुक्यातल्या कोरेगावातील ही घटना आहे. या बोअरचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. विद्युत पंप न लावता बोअरच्या बाहेर  घटनेबाबत अधिक माहिती अशी की,  धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात चमत्कार घडला असं म्हणावं लागेल. उमरगा तालुक्यातील कोरेगावमध्ये एक बोअर गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहे. मात्र या बोअरमधून चक्क 50 फुटांपर्यंत उंच पाण्याचा फवार उडाला आहे. हे पाणी कुठलीही विद्युत मोटर न लावता बोअरमधून बाहेर आल्याचा दावा ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला आहे.

Omraje Nimbalkar : मोठी बातमी! ओमराजे थोडक्यात वाचले; टिप्पर अंगावर येताच मारली उडी, घातपात की अपघात? तपास सुरू   बोअरमधून अचानक 50 फूटांपर्यंत पाणी वर उडाल्यानं ग्रामस्थ आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांनी या पाण्याचा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.  दरम्यान याबाबत न्यूज 18 लोकमतने या प्रकाराची खात्री करण्यासाठी उमरगा तहसीलदारांशी संपर्क साधला असता, हा व्हिडीओ कोरेगावमधीलच असल्याचं त्यांनी सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या