जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Omraje Nimbalkar : मोठी बातमी! ओमराजे थोडक्यात वाचले; टिप्पर अंगावर येताच मारली उडी, घातपात की अपघात? तपास सुरू

Omraje Nimbalkar : मोठी बातमी! ओमराजे थोडक्यात वाचले; टिप्पर अंगावर येताच मारली उडी, घातपात की अपघात? तपास सुरू

ओमराजे अपघातातून थोडक्यात बचावले

ओमराजे अपघातातून थोडक्यात बचावले

धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत.

  • -MIN READ Osmanabad,Osmanabad,Maharashtra
  • Last Updated :

धाराशिव, 10 जून :  धाराशिवमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर अंगावर येताच त्यांनी प्रसंगावधान राखत उडी मारली, त्यामुळे ते या घटनेतून सुखरूप बचावले आहेत. पोलिसांनी आरोपीला पकडलं असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, धाराशिवचे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे सकाळी व्यायाम करायला जात असताना टिप्परच्या धडकेतून थोडक्यात बचावले आहेत. भरधाव टिप्पर त्यांच्या अंगावर आलं. मात्र ओमराजे यांनी प्रसंगावधान राखत रोडच्या खाली उडी मारली. त्यामुळे ते या अपघातातून थोडक्यात बचावले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी भरधाव टिप्परचा पाठलाग करत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीला ओव्हरटेक करण्याच्या नादात हा प्रकार घडल्याचं चालकानं पोलिसांना सांगितल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान ही घटना चुकीने घडली की  या मागे काही घातपाताचा प्रकार आहे, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. मी सुखरूप असल्याची प्रतिक्रिया या अपघातानंतर ओमराजे निंबाळकर यांनी दिली आहे. दरम्यान या प्रकरणात टिप्पर चालकाविरोधात कलम 279, 336, 184 अन्वये ढोकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात