JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Devendra Fadnavis : '...तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार', फडणवीस स्पष्टच बोलले

Devendra Fadnavis : '...तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार', फडणवीस स्पष्टच बोलले

नागपूर जिल्ह्यातील पार शिवणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे.

जाहिरात

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नागपूर, 11 जून : नागपूर जिल्ह्यातील पार शिवणीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी घणाघाती टीका केली आहे. 2019 मध्ये भाजप-शिवसेना युतीला 165 जागा देऊन निवडून दिलं, पण ठाकरेंनी खूर्चीच्या लालसेपोटी भाजपची साथ सोडली, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. गेल्या अडीच वर्षांमध्ये राज्यात जुलमी सरकार राज्य करत असल्याचं म्हणत त्यांनी महाविकासआघाडीवर निशाणा साधला. सकाळी 9 वाजता भोंगा सुरू होतो तो थेट रात्री 10 वाजता बंद होतो, असा टोलाही फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला आहे. ‘अडीच वर्षांमध्ये उद्धव ठाकरे फक्त दोन वेळा मंत्रालयात गेले. हे मी म्हणत नाही. शरद पवारांनी आपलं आत्मचरित्र लिहिलं, यामुळे आमच्या सरकारच्या प्रतिमेवर विपरित परिणाम झाला हे त्यांनी आत्मचरित्रात लिहून ठेवलं. आपल्यासोबत युतीमध्ये निवडून आलो, पण उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्र्यांची खूर्ची पसंत आली आणि खूर्चीच्या लालसेने त्यांनी आपली साथ सोडली. त्या खूर्चीकरता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ पकडली,’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. …तर सत्तेला ठोकर मारू ‘हे सत्तेकरता तयार नाही केलं, हे विचारांकरता तयार केलेलं सरकार आहे. सत्ता येते, सत्ता जाते पण विचारांकरताची आमची लढाई कधीच संपू शकत नाही. सत्तेला आम्ही ठोकर मारतो. विचार सोडायची वेळ आली तर सत्तेला ठोकर मारायलाही आम्ही तयार आहोत,’ असं फडणवीस म्हणाले. ‘आपले विरोधक रोज जहर उगळतात. हे रोज खोटं बोलून जहर पाजतात. सकाळी 9 वाजता खोटं बोलणाऱ्यांचा भोंगा सुरू होतो, तो रात्री 10 वाजेपर्यंत सुरू असतो. हे स्वत: काही करत नाहीत. सत्तेत असतात तेव्हा बदल्यांमध्ये पैसे खातात. हे सत्तेवर असतात तेव्हा मोठ्या प्रमाणावर कमिशनखोरी करतात. हे सत्तेवर असतात तेव्हा गरिबाचा घास छिनून घेतात. पण सत्तेबाहेर गेले की रोज खोटं बोलून लोकांच्या मनामध्ये संभ्रम पैदा करतात,’ असा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या