बिपरजॉय चक्रीवादळ अपडेट
मुंबई, 14 जून, स्वप्नील घाग : बिपरजॉय चक्रीवादळ कोकणातून पुढे सरकले असले तरीही या वादळाचा प्रभाव समुद्रावर अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतंय. कोकणातील बहुतांश किनारपट्टीवरील भागांना लाटांचा मोठा तडाखा बसला आहे. गुहागरमध्ये बाग परिसरात कासवांचं संवर्धन केलं जात. ही जागा लाटांच्या तडाख्यानं उद्ध्वस्त झाली आहे. याठिकाणी असलेली सुरुची अनेक झाडे लाटांच्या दणक्यानं जमीनदोस्त झाली आहेत. अनेक झाडं पाण्यात वाहून गेली आहे. मान्सून सक्रिय होत असताना किनारपट्टीवरील हवेचा वाढता वेग आणि अजस्त्र लाटा धडकी भरवणाऱ्या आहेत. गुजरातला तडाखा दरम्यान दुसरीकडे बिपरजॉय चक्रीवादळ उद्या गुजरातच्या कच्छ किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर गुजरातच्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावातील तीस हजार लोकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आलं आहे. बिपरजॉय चक्रीवादळ 15 जूनला दुपारच्या सुमारास सौराष्ट्र , कच्छच्या किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. बिपरजॉय चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर कच्छ आणि सौराष्ट्र जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून देखील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आहे. Monsoon Update : मान्सूनबाबत ‘स्कायमेट’कडून महत्त्वाची अपडेट; भाकीत खरे ठरल्यास शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार बिपरजॉय चक्रीवादळ उद्या 15 जूनला कच्छच्या समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते पाकिस्तानकडे सरकरणार आहे. जसं जसं हे चक्रिवादळ उत्तर-पश्चिमेकडे जाईल तसं तसं ते आणखी रौद्र रूप धारण करण्याची शक्यता आहे. सध्या बिपरजॉय चक्रीवादळ हे कराची पासून 380 किलोमीटर अंतरावर आहे.