कल्याण, 23 डिसेंबर: व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला प्रकरणातील आरोपींची जामिनावर सुटका (Accused released from jail) झाली. विशेष म्हणजे त्यांचं स्वागत करण्यासाठी साथीदारांनी फटाके वाजवून जल्लोष करण्यात आला. धक्कादायक बाब म्हणजे या जल्लोषात फरार आरोपींचाही समावेश होता, असं समजतं. कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा (Chinchpada, Kalyan East) परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमुळे गुन्हेगारांची हिंमत किती वाढली आहे, हे दिसून येत आहे. तर कोरोना काळात फाटक्यांवर बंदी असताना जामिनावर सुटलेल्या आरोपींसाठी स्वागतासाठी फटाके वाजवल्याने कल्याण पूर्वेत याची चर्चा सुरू झाली आहे. हेही वाचा… पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्यात मोठी चोरी, 38 लाखांचं साहित्य लंपास
कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात राहणाऱ्या शैलेश म्हात्रे या केबल व्यावसायिकावर काही दिवसापूर्वी हल्ला झाला होता. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन काही आरोपींना अटक केली होती. तर काही आरोपी फरार होते. म्हात्रे यांच्यावर हल्ला करणारया दोन आरोपी मंगेश पावशे आणि सचिन माळी यांची जामिनावर सुटका झाली. जेलमधून सुटल्यानंतर हे दोन्ही आरोपी चिंचपाडा परिसरात आल्यानंतर त्यांचे फटाकेवाजून स्वागत करण्यात आले. जल्लोष साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे या जल्लोषात म्हात्रे यांच्यावर हल्ला करणारा अनंता पावशे नावाचा आरोपी सुद्धा सामिल झाला होता. हेही वाचा… एल्गार परिषदेवरून पुण्यात वाद पेटला! ब्राह्मण महासंघानं केली ‘ही’ मागणी काय म्हणाले फिर्यादी शैलेश म्हात्रे? केबल व्यावसायिक शैलेश म्हात्रे यांचे म्हणणे आहे की, आरोपी जेलमधून सुटून आले. त्यांनी जल्लोष केला. या जल्लोषात एक फरार आरोपीही सामिल होता. त्यांच्याकडून माझ्या जिविताला धोका आहे. पोलिसांनी ठोस कारवाई करुन मला न्याय द्यावा. त्यामुळे कोळसेवाडी पोलिसांची भूमिका महत्त्वाची आहे. आता ते या प्रकरणाकडे कसं लक्ष देतात, हे पाहावं लागणार आहे.