'केवळ शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात संघटना आहे. आज महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण...
नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 29 ऑगस्ट : राज्यात महाविकास आघाडीचं सरकार (mva government) असतानाही वर्धा (wardha) जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा (corona) नायनाट होत नाही, तोच सध्या डेंग्यूनं थैमान घातलं आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकालात होत नाही, तोपर्यंत कुठल्याही निवडणुका होऊ नयेत. महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) शेतकऱ्याला भेटत नाहीत, असा असा थेट आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या (ncp) वर्धा येथील जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजू तिमांडे (raju timade) यांनी केला. यावेळी खासदार सुप्रिया सुळे व्यासपीठावर होत्या. वर्ध्यातील शिववैभव मंगल कार्यालयात जिल्हा पदाधिकारी व निवडक कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, माजी आ. सुरेश देशमुख, माजी आ. राजू तिमांडे, सुधीर कोठारी, शरयू वांदिले उपस्थित होते. यावेळी हिंगणाघाटचे माजी आमदार राजू तिमांडे () यांनी थेट मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भेटत नसल्याचा खळबळजनक आरोप केला. उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का तिमांडे बोलताना यावरचं थांबले नाहीत तर त्यांनी सुप्रियाताईना थेट प्रश्न विचारला, ‘तुम्ही औरंगाबादच्या सभेत म्हणाला होत्या. पवार साहेबांनी रक्ताचं पाणी केलं म्हणून राष्ट्रवादी आज जिवंत आहे. हे जर खरं असेल तर राष्ट्रवादी कुठे चालली आहे, याचा विचार करायला हवा’ असा सवाल त्यांनी उपस्थित करीत जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याचे दाखवून दिले. ‘केवळ शरद पवार यांच्यामुळेच महाराष्ट्रात संघटना आहे. आज महाराष्ट्रात आघाडीचं सरकार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीचे मंत्री मंत्रालयात बसतात. पण, मुख्यमंत्री बांधावरच्या शेतकऱ्यांना भेटू शकत नाहीत, ही शोकांतिका आहे. शरद पवार हे शेतकऱ्यांना भेटायचे, पण हे मुख्यमंत्री कुणाला भेटत नाही, असे म्हणत त्यांनी सुप्रिया सुळेंसमोरच मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला. महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांवर स्थानिक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने हल्लाबोल केल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्याचे दिसून येत होते. RRB Group D परीक्षेसंदर्भात अपडेट; अनेक टप्प्यांत परीक्षा होण्याची शक्यता ‘राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे, तिन्ही पक्ष एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. मात्र, अनेकदा स्थानिक पदाधिकाऱ्यांना एकमेकांचे पाय ओढावे लागतात. त्यातून, जुळवून घ्यावे लागते. राज्यात सरकार असतानाही वर्धा जिल्हा दुष्काळग्रस्त होऊ शकला नाही. जोपर्यंत कोरोनाचा नायनाट होत नाही, तोपर्यंत कुठलाही राष्ट्रवादीचा कार्यक्रम वर्ध्यात घेऊ नका. शरद पवार यांनाही दिवाळी नंतरच इकडे पाठवा, असे वर्ध्यातील कार्यकारिणीच्या सभेत राजू तिमांडे यांनी म्हटलंय.