Home /News /career /

RRB Group D Recruitment: परीक्षेसंदर्भात आली महत्त्वाची अपडेट; अनेक टप्प्यांत परीक्षा होण्याची शक्यता

RRB Group D Recruitment: परीक्षेसंदर्भात आली महत्त्वाची अपडेट; अनेक टप्प्यांत परीक्षा होण्याची शक्यता

आरआरबी ग्रुप डी भर्ती 2021 भरती परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते.

    नवी दिल्ली, 29 ऑगस्ट: दोन वर्षांपूर्वी रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डनं (RRB) RRB Group D च्या भारतीयांबत भरतीबाबत (RRB Group D Recruitment) घोषणा केली होती. तेव्हापासूनच या परीक्षेसाठी पात्र उमेदवारांनी  सुरुवात केली होती. परीक्षा कधी होणार (RRB Group D exam) याची प्रतीक्षा सर्वजण करत होते. RRB Group D भरती 2021 भरती परीक्षेच्या तारखा (RRB Group D exam Dates) लवकरच जाहीर केल्या जाऊ शकतात असं अनेक मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मात्र यंदा या परीक्षांबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. RRB ने मार्च 2019 मध्ये 1.03 लाखापेक्षा जास्त पदांवर या भरतीसाठी अधिसूचना जारी केली होती. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या 2 वर्षांपासून परीक्षा होऊ शकली नाही. परंतु, हळूहळू परिस्थिती सुधारल्यानं भरती परीक्षांची फेरी पुन्हा सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत, आरआरबी ग्रुप डी भर्ती 2021 भरती परीक्षा देखील लवकरच घेतली जाऊ शकते. हे वाचा - Study in Abroad: UG कोर्ससाठी परदेशात जाताना 'या' महत्त्वाच्या गोष्टींकडे करू नका दुर्लक्ष; अन्यथा... मात्र यंदा ही भरती परीक्षा अनेक टप्यांमध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या घेतलेल्या सर्व भरती परीक्षांमध्ये कोविड नियमांचं पालन करणं बंधनकारक आहे. सुमारे 1.15 कोटी उमेदवारांनी आरआरबी ग्रुप डी भर्ती परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. अशा परिस्थितीत, कोरोनामुळे एकावेळी अनेक उमेदवारांची परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे ही भरती परीक्षा ही अनेक टप्प्यांमध्ये घेतली जाण्याची शक्यता आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Jobs, Railway jobs

    पुढील बातम्या