मराठी बातम्या /बातम्या /Viral /

उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

उड उड रे COW : आकाशात उडाल्या 10 गायी, पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का

आकाशात उडणाऱ्या गायींचा (Flying Cows) व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियात (social media) चांगलाच व्हायरल (viral) होत आहे.

  • Published by:  desk news

बर्न, 29 ऑगस्ट : आकाशात उडणाऱ्या गायींचा (Flying Cows) व्हिडिओ (video) सध्या सोशल मीडियात (social media) चांगलाच व्हायरल (viral) होत आहे. नागरिकांना अचानक आकाशातून गायी चालल्याचं दिसलं आणि त्यांचा त्यांच्या डोळ्यावर विश्वासच बसेना. हा व्हिडिओ आहे स्वित्झर्लंडमधला. इथे डोंगराळ भागात राहणाऱ्या गायींचं रेस्क्यु ऑपरेशन करण्यात आलं. त्यात त्यांना एका डोंगराळ भागातून एका केबलला बांधून दुसरीकडे हलवण्यात आलं. त्यामुळे खालून पाहणाऱ्याला गायी उडत असल्याचा फिल आला.

जखमी गायींना हलवले

स्वित्झर्लंडमध्ये क्लॉसेनपस हा भाग डोंगराळ आहे. या भागात अनेकदा गायी जखमी होतात. अशा गायींना दवाखान्यात नेण्यासाठी त्यांना डोंगर उतरवून खाली घेऊन येणे जिकीरीचे असते. खाली येताना जखमी गायी अधिकच जखमी होण्याची शक्यता असते. त्यासाठी त्यांना केबलच्या साहाय्याने हवेतूनच एका जागेवरून दुसऱ्या जागी हलवण्यात येतं. नुकतंच अशा 10 जखमी गायींना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आलं.

अनेकदा डोंगराळ भागात कडा कोसळण्याच्या घटना घडतात. त्यामध्ये गायी आणि म्हशी जखमी होतात. अशा प्राण्यांना तातडीनं उपचार मिळण्यासाठी हवाई केबलमार्गे नेण्यात येतं. अनेकांना हा प्रकार माहित नसल्यामुळे आकाशात उडणाऱ्या गायी पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. असाच धक्का यावेळीदेखील अनेकांना बसला आणि बऱ्याचजणांनी या उडणाऱ्या गायींचे फोटो टिपले, तर अनेकांनी व्हिडिओ तयार केले.

हे वाचा - दुसऱ्या पत्नीला खूश करण्यासाठी केला पोटच्या लेकीचा खून

अनेकांच्या कमेंट्स

या उडणाऱ्या गायींच्या फोटोवरून सोशल मीडियात रंगतदार चर्चादेखील रंगली होती. आकाशातून जात असताना एखाद्या गायीनं शेणं टाकलं तर काय होईल, असा प्रश्न एखाद्याने विचारला. तर त्याला तितकंच मजेशीर उत्तर दुसऱ्याने दिसलं. खाली मान घालून चाललेल्या एखाद्याला अंगावर शेण पडलं तरी असं वाटेल की एखाद्या पक्ष्यानेच हा पराक्रम केला आहे. पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच असेल.

First published:

Tags: Viral video on social media, Viral video.