संजय राऊत
सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 08 जून : छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा संभाजीनगर शाखा वर्धापन दिन साजरा झाला. आजच्या या कार्यक्रमात मात्र संजय राऊत यांनी सगळ्या नेत्यांचे कान उपटले, तर वरिष्ठांच्या समोरच काही नेत्यांनी आपल्या मनातली खदखद मोकळी केली. त्यामुळे पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यात असलेली राजकीय सुरसुरी पाहण्यास मिळाली. मुंबईनंतर शिवसेनेची पहिली शाखा संभाजीनगरमध्ये स्थापन झाली. आज त्याला 38 वर्षे झाली. त्या निमित्त आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन झाले. या कार्यक्रमासाठी खासदार संजय राऊत 2 दिवस शहरात राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अंबादास दानवे यांनी ब्रम्हानंद देशपांडे यांचे पत्र वाचून दाखवले. या पत्रावरून चंद्रकांत खैरे यांनी आपल्या भाषणात दानवे यांना कोपरखळी मारली आणि म्हणाले, ‘अंबादास दानवे सुद्धा भाजपमधून आले. त्यांनी आपल्या भाषणात मी पहिला हिंदू खासदार झालो हे अंबादास दानवे यांनी सांगितले नाही’ अशी नाराजी व्यक्त केली.
(Thane News : आव्हाड, छप्पराने आभाळ व्हायचा उद्धटपणा करू नये; ठाण्यात बॅनरवॉर)चंद्रकांत खैरे यांनी अंबादास दानवे यांच्यावर केलेल्या टिप्पणीमुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. संजय राऊत ही अचंबित झाले. यावर अंबादास दानवे म्हणाले की, ‘मी मनाचे भाषण केलेच नाही. मी तर त्याकाळी ब्रम्हानंद देशपांडे यांचे संभाजीनगर शिवसेनेवर लिहिलेला जुना लेख वाचला. आता याच कार्यक्रमाचा दुसरा अंक. कार्यक्रमाला सुरुवात 10 वाजता होणार होती. मात्र पदाधिकारी आले नसल्याने कार्यक्रम 12 वाजता सुरू केला. संजय राऊत आले तरी नाट्य मंदिर अर्धे रिकामेच होते. त्यामुळे संजय राऊत यांनी कडक शब्दात नेत्यांना सुनावलं. ( Kolhapur News : कोल्हापुरात पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, संशयिताच्या घरावर मध्यरात्री दगडफेक ) संजय राऊत यांनी कार्यकर्ता उपस्थितीवर बोलल्यामुळे मंचावरील सर्व नेत्यांचे चेहरे पडले. कार्यक्रमाचे आयोजन चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्याकडे होते. अंबादास दानवे यांनी प्रसंग सांभाळून नेण्याचा प्रयत्न केला. एकंदरीतच संभाजीनगरचा आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने आपसातील मतभेद उघड करणारा ठरला. ठाकरे गटामधील आपसातील मतभेदाचा विरोधी पक्ष राजकारणात उपयोग करणार असे होणार नाही.