मुंबई, 08 जून : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के यांनी टीका केली होती. धर्मवीर आनंद दिघे यांना जामीन मिळवून देण्यासाठी शरद पवारांनी मदत केली होती असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. यावरून आता ठाण्यात बॅनर वॉर रंगले आहेत. कळवा नाका परिसरात आनंद दिघे यांच्या फोटोसह काही मजकूर लिहिलेला बॅनर लावण्यात आला आहे. यावर थेट उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेवर निशाणा साधण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री जितेंद्र आव्हाड व शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचा धर्मवीर आनंद दिघे यांच्यावरून चालू असलेल्या वादातून शिवसेनेने हे बॅनर लावले आहेत. यावर म्हटलं की, सुरक्षा कमी करून धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्यासारख्या दरारा असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला भीती दाखवायचा निष्कळ प्रयत्न करणारे पळपुटे तुम्ही… साहेबांना जामीन देणारे तुम्ही कोण? धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी मदत तीही तुमच्याकडुन ? मागितली असं बरळता? थुंकी विकास आघाडीचे थेंब आहात तुम्ही. आव्हाड छप्पराने आभाळ बनायचा उद्धटपणा करू नये.
ठाण्यात बॅनरबाजी
Kolhapur News : कोल्हापुरात पुन्हा वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न, संशयिताच्या घरावर मध्यरात्री दगडफेक आव्हाड-म्हस्के वादावर अद्याप ठाकरे गटाकडून कोणतीच प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्यातच आता बॅनरवरून थेट ठाकरे गटालाच प्रश्न विचारण्यात आला आहे. कळवा परिसरात बॅनर लावण्यात आळे असून थेट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या गटावर निशाणा साधला जात आहे. जितेंद्र आव्हाड जे काही बोलतायत ते खरं आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे.