JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / वर्गात बाकावर बसण्यावरून भांडण; मित्रांनी मधल्या सु्ट्टीत संपवलं, कार्तिकचा धक्कादायक शेवट

वर्गात बाकावर बसण्यावरून भांडण; मित्रांनी मधल्या सु्ट्टीत संपवलं, कार्तिकचा धक्कादायक शेवट

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 20 जुलै, अविनाश कानडजे : छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शाळेच्या मधल्या सुटीत मैदानावर चार वर्ग मित्रांनी केलेल्या मारहाणीत एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे, कार्तिक मनोहर गायकवाड असं या मारहाणीत मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. या प्रकरणात दौलताबाद पोलीस अधिक तपास करत आहेत. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, कार्तिक गायकवाड हा अकरा वर्षांचा मुलगा दौलताबाद येथील देवगिरी विद्यालयात इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होता. वर्गात बसण्यावरून त्याचा एका वर्ग मित्राशी वाद झाला. त्यानंतर मधल्या सुटीत शाळेच्या मैदानावर कार्तिक खेळत असताना वाद झालेल्या अल्पवयीन विद्यार्थ्याने आणि त्याच्या मित्रांनी कार्तिकला एकटं गाठून मारहाण केली. त्या दिवशीपासून कार्तिकच्या पोटात दुखत होते. Chhatrapati Sambhaji nagar News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं दरम्यान त्यानंतर कार्तिकला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तिथेच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कार्तिकच्या वडिलांच्या तक्रारीवरून दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कार्तिकच्या मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या