जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chhatrapati Sambhaji nagar News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं

Chhatrapati Sambhaji nagar News : दारुसाठी पैसे दिले नाहीत म्हणून डोक्यात घातली कुऱ्हाड, छ. संभाजीनगर हादरलं

मेहुण्याच्या हत्येचा थरार

मेहुण्याच्या हत्येचा थरार

Chhatrapati Sambhaji nagar News : या धमकीनंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने कुऱ्हाड काढली आणि मेहुण्याच्या मानेवर दोन-तीन वार केले.

  • -MIN READ Chhatrapati Sambhaji Nagar,Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग आल्याने साल्यानेच कुऱ्हाडीचे घाव घालून आपल्या मेव्हण्याचा खून केल्याची घटना कन्नड तालुक्यातील तपोवन भागात उघडकीस आली आहे. रणजीत अंकुश माळी असे मयताचे नाव असून नंदू गायकवाड असे आरोपीचे नाव आहे. या दोघांमध्ये पैशावरून जोरदार भांडण आणि शिवीगाळ सुरू झाली यातच आरोपी नंदू ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता तुला जास्त मस्ती आली तुझा काटा काढतो अशी धमकी दिली.

News18लोकमत
News18लोकमत

या धमकीनंतर दोघांमधील वाद विकोपाला गेला आणि आरोपीने कुऱ्हाड काढली आणि मेहुण्याच्या मानेवर दोन-तीन वार केले. यानंतर आरोपी नंदू याने डोंगराच्या दिशेने पळ काढला. मृत व्यक्तीचं नाव रणजी असल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पिशोर पोलीस ठाण्यात मयताच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून नंदू गायकवाड विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे छत्रपती संभाजीनगर हादरलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात