सीसीटीव्हीमधील दृश्ये.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर, 12 एप्रिल : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. यासोबतच राज्यात अपघाताच्या घटनांमध्येही सातत्याने वाढ होत असल्याचे दिसत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून ही घटना समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये छोट्याशा चुकीमुळे भीषण अपघात झाला. वेगाने येणाऱ्या दोन दुचाकींमध्ये हा भीषण अपघात झाला. विशेष म्हणजे आयशर आणि दुचाकीच्या झालेल्या अपघाताच्या ठिकाणीच हा दुसरा अपघात झाला. दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघाताची थरारक दृश्ये CCTV मध्ये कैद झाली आहे.
राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्या घटना समोर येत आहेत. त्यातच आता बिडकीन इसारवाडी येथील शेकटा फाटा येथे भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. दोन दुचाकींमध्ये हा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये वाहन चालक गंभीर जखमी झाले आहेत.