प्रातिनिधीक छायाचित्र
छत्रपती संभाजीनगर, 24 जून, अविनाश कानडजे: छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या दोन महिलांच्या भांडणात कुत्र्याला हकनाक जीव गमवावा लागला आहे. शहरातील दगडगल्ली कुंभारवाडा परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणात संबंधित महिलेवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन पाळीव कुत्र्यांची भांडणं लागली, हे भांडण त्यांच्या मालकांपर्यंत पोहोचलं आणि यातूनच एका कुत्र्याला आपला जीव गमवाला लागला आहे. दोन महिलांचं भांडण घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शेजारी -शेजारी राहणाऱ्या दोन्ही महिलांनी कुत्रं पाळलं होतं. त्यांच्या कुत्र्यांची भांडणं झाली. त्यानंतर त्यावरूनच दोन्ही शेजारनीमध्ये तुफान राडा झाला. दोघींची भांडणं सुरू असताना आरोपी महिलेला दुसऱ्या महिलेचा कुत्रा दिसला. हा कुत्रा आपल्या कुत्र्याच्या अंगावर धावून आला, आणि आता त्याची मालकीन देखील आपल्याशी भांडण करत असल्याचा या महिलेला राग आला.
टरबूज कापताना छातीत घुसला चाकू, लिव्ह इन पार्टनरचा मृत्यू, अपघात का घातपात?गुन्हा दाखल महिलेनं रागाच्या भरात कुत्र्यावर विटांचे प्रहार केले. या घटनेत कुत्र्याला गंभीर दुखापत झाली. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र त्याचा मृत्यू झाला. कुत्र्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुत्र्याच्या मालकीनीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संबंधित महिलेविरोधात सिटीचौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.