JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / VIDEO : हातात दगडं आणि काठ्या घेऊनच फिरावं लागतं, संभाजीनगरमधील या भागात इतकी दहशत का?

VIDEO : हातात दगडं आणि काठ्या घेऊनच फिरावं लागतं, संभाजीनगरमधील या भागात इतकी दहशत का?

छत्रपती संभाजीनगरमध्ये भटक्या कुत्र्यांच्या बाबतीत एक धक्कादायक प्रकार घडलाय.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

छत्रपती संभाजीनगर, 7 जुलै : भटक्या कुत्र्यांची दहशत ही जवळपास प्रत्येक महानगरातील गंभीर प्रश्न आहे. शहरातील अनेक भागात या कुत्र्यांमुळे सामान्य नागरिकांना जीव मुठीत धरुन जगावं लागतं. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या नागरिकांचा उद्रेक छत्रपती संभाजीनगरमध्ये झालाय. काय घडले प्रकरण? संभाजीनगरमधील दोन भटक्या कुत्र्यांनी लहान मुलांचा चावा घेतला. या कुत्र्यांनी एक नव्हे तर पाच मुलांचा एकाच दिवसांमध्ये चावा घेतला. या घटनेमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी धक्कादायक पाऊल उचलत दोन कुत्र्यांना फाशी दिलीय. या प्रकरणानंतर ‘लोकल18’ च्या टीमनं परिसरातील नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या. त्यावेळी त्यांनी महापालिकेच्या कारभारावर टीका केलीय.

‘आमच्या भागात रात्री कुणाला यायचं असेल तर हातात दगड आणि काठी घेऊन यावं लागतं. अन्यथा, कुत्रे मागे लागतात. अनोळखी व्यक्तीला कुत्रे चावण्याचं प्रमाण वाढलंय. आम्ही या प्रकरणात महापालिकेला वारंवार तक्रार केली. या तक्रारीची पालिकेनं दखल घेतली नाही. आम्ही रात्री आठनंतर घराबाहेर निघू शकत नाही,’ अशी तक्रार संजय नगरच्या रहिवांशांनी केलीय. ‘जर्मन शेफर्ड’ खरंच शिकारीसाठी वापरला जातो का? तुम्हाला माहिती नसेल पण… या संपूर्ण प्रकरणाची महापालिकेनं तातडीनं दखल घ्यावीस अन्यथा आम्ही पालिकेवर मोर्चा नेऊन प्रशासनाला जाब विचारू असा इशारा या नागरिकांनी दिलाय.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या