नागपूर, 6 जुलै: प्रामाणिकपणा या स्वभावाला अनुसरून कुठल्या प्राण्याचा विचार केला तर क्षणात तोंडी येणारे नाव म्हणजे कुत्रा. प्रदीर्घ काळापासून मनुष्य आणि श्वान यांचं नातं चालत आलं आहे. आजही बहुतांश लोकांना आपल्या घरी एखादा श्वान असावा असं वाटतं. सध्या श्वानाचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. त्यातीलच एक नाव म्हणजे जर्मन शेफर्ड होय. बऱ्याचदा पोलिसांजवळ दिसणारा जर्मन शेफर्ड त्याच्या काही खास कौशल्यामुळे ओळखला जातो. जर आपण देखील घरी श्वान पाळण्याच्या विचारात असला तर जर्मन शेफर्ड यांच्या काही खास गुणांमुळे हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. सर्वांर्थानं फुल पॅकेज डॉग जर्मन शेफर्ड. जगभरात जर्मन शेफर्ड ही एक प्रख्यात श्वानाची प्रजाती आहे. वरकरणी पाहता प्रत्येक श्वानमध्ये काही गुण हे सारखेच असेल तरी प्रत्येक श्वानाची थोड्या अधिक फरकाने काही वेगळेपणही असतं. जर्मन शेफर्ड हा अतिशय अज्ञाकारक आहे. आत्मसंरक्षण आणि त्याची नाकाद्वारे गंध घेण्याची क्षमता सर्वाधिक आहे. इतर श्वानांच्या तुलनेने हा गुण त्याला विषेश ओळख प्राप्त करून देतो. हा श्वान अतिशय प्रामाणिक, मालकाप्रती फार समर्पक, आज्ञाधारी आणि प्रत्येक काम करण्यासाठी तत्पर असणारा श्वान आहे. त्यामुळंच जर्मन शेफर्ड हा सर्वांर्थाने एक फुल पॅकेज डॉग आहे, असं नागपूर येथील श्वान प्रशिक्षक आणि श्वान बिहेवियरिस्ट श्रीकांत वाढी म्हणतात.
मनुष्याचा सहवास प्रिय जर्मन शेफर्ड अतिउत्साही, कसरती आणि कायम कुठलेही काम, मालकाने सांगितलेली कृती करण्यासाठी उत्तेजीत असतो. लहान मुलांच्या दृष्टीने तसेच कुटुंबात वावरताना एक कुटुंबीयातील सदस्य असल्याप्रमाणे तो वावरतो. मात्र हा सगळा सवयींचा आणि प्रशिक्षणाचा भाग आहे. जर्मन शेफर्ड या जातीच्या श्वानाला मनुष्याचा सहवास सर्वात प्रिय असतो, असं वाढी सांगतात. वेळ द्यावाच लागतो योग्य प्रशिक्षण, परिपूर्ण सवई, कुटुंबात कसे वावरावे, आदी प्राथमिक गोष्टी या प्रशिक्षणातून शिकवल्या जातात. मात्र या गोष्टीकडे लक्ष न दिल्यास त्यांच्या स्वभावात आक्रमकता वाढत जाऊन काही समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे आपली श्वानाला वेळ देण्याची, त्यासोबत त्यांच्या आवडी निवडी नुसार मजा मस्ती करण्याची तयारी असेल तर या श्वानाचा विचार करायला हवा. अन्यथा इतर पर्याय उपलब्ध आहेत, असं श्रीकांत वाढी सांगतात. लॅब्रेडोर की जर्मन शेफर्ड कोणता श्वान पाळणं महाग? पाहा या 5 श्वानांसाठी किती येतो खर्च? श्वान पथकात दिसतो जर्मन शेफर्ड जर्मन शेफर्ड हा श्वान प्रामुख्याने शिकारी स्वभावाचा असून त्यासाठीच तो वापरला जात होता. कालांतराने त्यात अनेक स्थित्यंतरे आलीत. हा एक वॉचडॉग म्हणून देखील ओळखला जातो. त्याच्या शरीर रचनेमध्ये विकसित झालेली गंध घेण्याची क्षमता ही इतर श्वानापेक्षा अधिक असते. यासोबतच कायम रेडी टू वर्क, संरक्षणाच्या बाबतीत योग्य, कर्तव्यदक्ष, आज्ञाधारक, कसरती आणि सुंगण्याची अतुलनीय क्षमता असते. या गुणांमुळे बरेचदा पोलिस श्वान पथकात, शोध व गुप्तचर यंत्रणांमध्ये आपल्याला जर्मन शेफर्ड बघायला मिळतो, अशी माहिती श्वान प्रशिक्षक श्रीकांत वाढी देतात.