JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / छ. संभाजीनगर गँगरेप प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर, तिघांनी दिली भयानक कबुली

छ. संभाजीनगर गँगरेप प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर, तिघांनी दिली भयानक कबुली

छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर), 05 एप्रिल : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक धक्कादाय घटना समोर आली आहे. मागच्या काही दिवसांपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. यामुळे परिसरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगर परिसरातील विमानतळ भागात बलात्काराची घटना समोर आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेला पकडून नेत तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना घडली आहे. दरम्यान उचलून नेत असताना तीचा खून करण्यात आला आहे. विमानतळाच्या भिंतीजवळ झुडपांमध्ये उचलून नेताना महिलेने तिन्ही आरोपींना प्रतिकार केला.  

तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन

संबंधित बातम्या

त्यामुळे झाडाला हात बांधून तिच्यावर अत्याचार केला जिवंत सोडले. यानंतर ती तक्रार करेल या भीतीने तिचा निर्घुण खून केल्याची कबुली आरोपींनी पोलीस चौकशीत दिल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.  

तीनही आरोपी महिलेवर मागील काही दिवसापासून पाळत ठेवून त्या महिलेवर अत्याचार केल्याची समोर आले आहे. तर एकाने काही दिवसांपूर्वी तिची छेड काढल्याचे बोलले जात आहे.

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती वेळ, न्यायालयाने दिले आदेश  

पुराव्याच्या आधारावर खटला फास्ट कोर्टात चालवण्याचा प्रयत्न पोलिसांचा असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या