जाहिरात
मराठी बातम्या / पुणे / तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन

तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन

तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू, पुण्यात काँग्रेस नेत्याला धमकीचा फोन

एका अज्ञात इसमाने व्हाट्सअपद्वारे खंडणी मागून काँग्रेस नेत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मेसेज आणि फोन केला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

वैभव सोनवणे, पुणे, 05 एप्रिल : पुण्यात भाजपच्या नेत्यापाठोपाठ आता काँग्रेसच्या नेत्यालासुद्धा धमकीचा फोन आहे.  काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना तीस लाख रुपये खंडणी मागण्यात आली. एका अज्ञात इसमाने व्हाट्सअपद्वारे खंडणी मागून तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याचा मेसेज आणि फोन केला आहे. या प्रकरणी स्वतः अविनाश बागवे यांनी पोलिसात तक्रार दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार, हा सगळा प्रकार काल म्हणजेच चार मार्च रोजी दुपारी पावणे चार च्या सुमारास घडला. अविनाश बागवे यांना काल एका अज्ञात इसमाने व्हाट्सअप वर मेसेज करून “तीस लाख रुपये दे नाहीतर तुझं पॉलिटिकल करिअर बरबाद करू”, अशी धमकी आली. तसेच पुढे या व्यक्तीने, “तुला माहिती नाही आम्ही सात आठ जण आहोत. पोलिसांनी आमच्यामधील दोघांना जरी आत टाकलं तरी आम्ही तुझ्या ऑफिसच्या आणि घराबाहेर असतो” असा आणखी एक मेसेज आला. या सगळ्या प्रकरणानंतर अविनाश बागवे यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

News18लोकमत
News18लोकमत

कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्ती वेळ, न्यायालयाने दिले आदेश   अज्ञात व्यक्ती विरोधात समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अविनाश बागवे हे माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे पुणे शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे यांचे सुपुत्र आहेत. काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रदेश सरचिटणीस यांच्या नावाने खंडणी उकळण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर काही दिवसातच भाजपचे नेते गणेश बिडकर यांना खंडणीसाठी फोन केला होता. या दोन्ही घटना ताज्या असतानाच आता काँग्रेसच्या नेत्याला नेमकी खंडणी कोणी मागितली याचा शोध पोलीस घेत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Congress , pune
  • First Published :
जाहिरात
जाहिरात