संभाजीनगरमध्ये 2 जिवलग मित्रांचा हृदयद्रावक शेवट
अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर 25 जुलै : वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याच्या सूचना वाहनचालकांना अनेकदा दिल्या जातात. मात्र तरीही काही लोक याकडे दुर्लक्ष करत रस्त्यावर नियम मोडून वाहने चालवताना दिसतात. कधीकधी हे प्रकार जीवावरही बेतात. अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. बोलेरो गाडीच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. घटनेक भरधाव दुचाकीवर रस्त्याच्या विरुद्ध दिशेनं ट्रिपल सीट जाणाऱ्या तिघा मित्रांच्या बाईकला अज्ञात बोलेरो गाडीने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हा भीषण अपघात जालना रोड सुंदरवाडी येथे झाला. घटनेची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. Viral Video: रील बनवण्यासाठी धबधब्यातील दगडावर उभा राहिला; पाय घसरताच तरुणासोबत घडलं भयानक विजय जगन्नाथ काकडे, अभिषेक राजू लोकल अशी घटनेत मृत्यू झालेल्या दोन मित्रांची नावं आहे. तर उमेश उर्फ गुड्डू उमानंद कत्तिकर याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अभिषेक हा कंपनीत काम करून परत आला होता. त्यानंतर विजय, अभिषेक, उमेश हे तिघे दुचाकीवरुन जालना रोडवर सुंदरवाडी येथे जेवण करण्यासाठी गेले होते. दुचाकीवर भरधाव वेगात झाल्टा फाटा येथून विरुद्ध दिशेने जात असताना अज्ञात बोलेरो गाडीने त्यांना धडक दिली. या अपघातानंतर बोलेरो चालक घटनास्थळावरून पसार झाला. जखमींना तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी दोघांना तपासून मृत घोषित केलं. तर एकावरती अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.