JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Political news : लोकसभेसाठी भाजपची रणनिती ठरली; सोशल मीडियाच्या वापराबाबत मोठा निर्णय, फडणवीसांकडून महत्त्वाच्या सूचना

Political news : लोकसभेसाठी भाजपची रणनिती ठरली; सोशल मीडियाच्या वापराबाबत मोठा निर्णय, फडणवीसांकडून महत्त्वाच्या सूचना

भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर रणनिती देखील तयार करण्यता आली आहे.

जाहिरात

देवेंद्र फडणवीस

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 3 जून : भाजपकडून आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात करण्यात आली आहे. आता सोशल मीडियावर पकड असलेले इन्फ्लुन्सरही प्रचाराच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय भाजपनं घेतला आहे. सोशल मीडियावरील लढाईसाठी सज्ज व्हा. 2024 च्या तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया इन्फ्लुन्सरला दिले आहेत. गरवारे क्लबमध्ये भाजप नेते आणि 300 हून अधिक सोशल मीडिया  इन्फ्लुन्सरची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस बोलत होते. सोशल मीडियाचा प्रभावी वापर   भाजपकडून आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियाचा वापर प्रभावीपणे करण्यात आला आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये देखील भाजपकडून सोशल मीडियाचा वापर मोठ्याप्रमाणात केला जाण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर  गरवारे क्लबमध्ये भाजप नेते आणि 300 हून अधिक सोशल मीडिया  इन्फ्लुन्सरची बैठक पार पडली. या बैठकीत फडणवीस यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत.  सोशल मीडियावरील लढाईसाठी सज्ज व्हा. 2024 च्या तयारीला लागा असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया इन्फ्लुन्सरला दिले आहेत. Political News : मुंबईत ठाकरे गटाला मोठा धक्का; आणखी दोन शिलेदार शिंदे गटात 9 वर्षांतील कामगिरीवर प्रकाश  या बैठकीमध्ये युट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक, ट्वीटर व इतर सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हजेरी लावली होती. मोदी सरकारच्या चांगल्या कामाचे व्हिडीओ तयार करावेत आणि ते सोशल मीडियावर जास्तीत जास्त प्रसारीत करण्याचे आदेश या सोशल मीडिया  इन्फ्लुन्संना देण्यात आले आहेत. सरकारच्या गेल्या  9 वर्षांतील कामगिरीवर इन्फ्लुन्सर प्रकाश टाकणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या