नाशिक, 26 सप्टेंबर: सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या आता एकत्र आल्या आहेत. त्यामुळे उगाच भांडणं लावणाऱ्यांना ठोका, असे आदेश खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या समर्थकांना दिले आहेत. सर्व मराठा संघटना एकत्र या, आपली ताकद काय आहे ते दाखवून देऊ. सर्व प्रकारच्या जबाबदारी निश्चित ठरवू, समाजातील सर्व विद्वानांना एकत्र करू आणि वेगवेगळ्या प्रेशर टाकणाऱ्या समिती तयार करू, असंही संभाजी राजे यांनी यावेळी सांगितलं. मराठा आंदोलकांनी भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असं आवाहन देखील संभाजीराजे छत्रपती यांनी नाशिक येथील मराठा आंदोलनाच्या राज्यस्तरिय बैठकीत दिला. हेही वाचा… पुणे जम्बो कोविड सेंटर येथून बेपत्ता झालेली महिला सापडली पिरंगुटच्या घाटात! खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली मराठा आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी ही नाशिक येथे राज्यस्तरीय बैठक सुरू आहे. राज्यातील सर्व मराठा संघटना एकाच छताखाली एकत्र आल्या आहेत. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठक सुरू आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे प्रतिनिधी म्हणून यशराजे पाटील तर राज्यातील 22 जिल्ह्यांचे समन्वयक सहभागी झाले आहेत. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला आहे. राज्यभरात ठिकठिकाणी सरकारविरोधात एल्गार पाहायला मिळत आहे. तर, मराठा आरक्षण आंदोलनाचं नाशकात बिगुल वाजलं आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वाखाली राज्यातील सर्व मराठा संघटना नाशकात एकाच छताखाली एकत्र आल्या. मराठा संघटनांच्या राज्यस्तरीय बैठक सुरू आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी बैठकीला संबोधित करताना सांगितलं की, मी राजकारणी म्हणून नाही तर मराठा म्हणून येथे आलो आहे. शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांचा वंशज म्हणून बोलत आहे. मात्र आज शिवाजी महाराजांची आयडॉलॉजी कुठे गेली? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. संभाजीराजे छत्रपती आजपर्यंत मॅनेज झाला नाही. संभाजीराजे पहिला वार झेलायला तयार आहे. आता. म्यानातून तलवार काढली आहे. भावनिक होऊ नका, काही गोष्टी गनिमी काव्यानं करायच्या असतात, असा सल्ला देखील संभाजीराजे भोसले यांनी यावेळी दिला. शरद पवार यांच्या भेटीवर संभाजीराजे यांनी सांगितलं की, मी छत्रपती म्हणून नाही तर मराठा समाजाचा घटक म्हणून शरद पवार यांच्याकडे गेलो होतो. दिल्लीतल्या पहिल्या शिवजयंतीला स्वतः राष्ट्रपती उपस्थित होते. हेही वाचा… मिठाई दुकानदारांसाठी आता नवे नियम, 1 ऑक्टोबरपासून लागू होणार देशभरात राष्ट्रपती आणि लष्कर प्रमुख, नौदलप्रमुख यांनी पायातले जोडे काढून महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केलं. शिवाजी महाराजांच्या नावाचा हा महिमा आहे, असंही संभाजीराजे यांनी सांगितलं.