JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा; चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला टोला

आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा; चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना लगावला टोला

पुणे महापालिकेच्या 16 प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 11 जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा आल्या

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुणे, 10 ऑक्टोबर: पुणे महापालिकेच्या 16 प्रभाग सामित्यांसाठी निवडणूक झाली. त्यापैकी 11 जागा या सत्ताधारी भाजपला मिळाल्या,  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला 4 जागा आल्या तर लकी ड्रॉ पद्धतीनं चिठ्ठी टाकून ठरवण्यात आलेली एक जागा कॉंग्रेसच्या पारड्यात पडली. या विजयावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. **हेही वाचा…** पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी! डिसेंबर-जानेवारीत आणखी वाढणार कोरोनाची आकडेवारी पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना काही स्वप्न पडत असतील तर त्यांनी त्यांची एनर्जी वाया घालवू नये. आम्ही पण तुमचे बाप आहोत, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना टोला लगावला. पुणे आम्ही तुमचे बाप आहोत, हे लक्षात ठेवा, अशा शब्दात टोला लगावला आहे. चंद्रकांत पाटील म्हणाले की, या प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या सर्व जागा भाजपला मिळायला हव्या होत्या अशी काहीतरी जादू व्हायला हवी होती. पण तसं झालं नाही. चंद्रकांत पाटील एवढ्यावरच थांबले नाहीत तर अजित पवारांना पुढची स्वप्नं पडत असातील तर त्यांनी उगाच त्यांची एनर्जी वाया घालवू नये, आम्ही तुमचे बाप आहोत, असं चंद्रकांत पाटील यांनी भाषण करताना म्हटलं. पुण्यात भाजपच्या कोथरुड मतदारसंघातील व्यापारी सेलच्या नियुक्त्या करण्यासाठी आयोजित बैठकीत चंद्रकांत पाटील बोलत होते. चंद्रकांत पाटील यांची खडसेंना भावनिक साद दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत जाणार असल्याची चर्चा सुरू असतानाच चंद्रकांत पाटील यांनी त्यांना भावनिक साद घातली आहे. एकवेळ चुकत असेल तर थोबाडीत मारा, पण त्या दांडक्यांसमोर (चॅनेल) जाऊ नका, असं चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना उद्देशून म्हटलं आहे. हेही वाचा.. आमदार धीरज देशमुख यांनी असा साजरा केला आईचा वाढदिवस, देवाकडे घातलं ‘हे’ साकडं जळगाव जिल्ह्यातील भाजपचे वजनदार नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. भाजपाच्या नवनियुक्ती राज्य कार्यकारणीची बैठकीत व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून त्यांनी बैठकीला उपस्थिती लावली होती. त्यामुळं या चर्चांनी काही काळासाठी पूर्णविराम मिळाला आहे. त्यावर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं की, खडसे राष्ट्रवादीत जाणार आहेत अशा चर्चा माध्यामांकडून होत आहेत. पण ते पक्षाचे नुकसान होईल असं काहीही करणार नाहीत. आजच्या बैठकीला ते पूर्णवेळ उपस्थित होते. ते पाय रोवून खंबीरपणे भाजपमध्येच आहेत. खडसे आमचे समजूतदार नेते आहेत. आमचे पालक आहेत. आम्ही त्यांची मुलं आहोत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या