JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / डोंबिवलीकरांना मोठा दिलासा, आता अवघ्या 20 मिनिटांत पोहोचा ठाण्याला!

डोंबिवलीकरांना मोठा दिलासा, आता अवघ्या 20 मिनिटांत पोहोचा ठाण्याला!

मुंबईसह ठाणेकरांसाठी खूशखबर आहे. आता डोंबिवलीवरून अवघ्या 20 मिनिटांमध्ये ठाणे गाठता येणं शक्य होणार आहे. यामुळे मोठा वेळ वाचणार आहे.

जाहिरात

डोंबिवलीहून ठाण्याला वीस मिनिटांत पोहोचता येणार

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 27 फेब्रुवारी : मुंबईसह ठाणेकरांसाठी खूशखबर आहे. आता डोंबिवलीवरून अवघ्या 20 मिनिटांमध्ये ठाणे गाठता येणं शक्य होणार आहे. यामुळे मोठा वेळ वाचणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएने नवा प्रकल्प हाती घेतला आहे. एमएमआरडीएकडून सध्या माणकोली ते मोटागाव जोडरस्ता आणि उल्हास खाडीपूल बाधण्यात येत आहे. या प्रकल्पात भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भुयारी मार्गामुळे ठाण्याहून डोंबिवलीला जाण्यासाठी दोन ते तीन किलोमिटरचा वळसा वाचणार असल्यानं डोंबिवलीहून ठाण्याला वीस मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार आहे. यासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भुयारी मार्गामुळे अंतर कमी होणार  मुंबई, नाशिक महामार्गावरून डोंबिवलीला जाण्यासाठी कल्याणमधून जावे लागते. त्यामुळे प्रवासात बराच वेळ लागतो. ही गोष्ट लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने माणकोली ते मोटागाव जोडरस्ता आणि उल्हास नदीवर सहा पदरी खाडीपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पामुळे नाशिक, मुंबई महामार्ग ते डोंबिवली हे अतंर तब्बल 27 किलोमीटरने कमी होणार आहे. तसेच या प्रकल्पात भुयारी मार्ग उभारण्यात येणार असल्यानं ठाणे ते डोंबिवली हे अंतर आणखी दोन ते तीन किलोमिटरने कमी होणार आहे. त्यामुळे डोंबिवलीमधून अवघ्या 20 मिनिटांमध्ये ठाण्याला पोहोचणे शक्य होणार आहे.

Wardha News: हरभरा उत्पादक संकटात, सरकारी धोरणांचा शेतकऱ्यांना फटका

संबंधित बातम्या

वेळेची बचत  डोंबिवलीहून ठाण्यात अवघ्या वीस मिनिटांमध्ये पोहोचणे शक्य होणार असल्यानं डोंबिवलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. यामुळे वेळेची मोठी बचत होणार आहे. या भुयारी मार्गामुळे ठाण्याहून डोंबिवलीला जाण्यासाठी दोन ते तीन किलोमिटरचा वळसा वाचणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या