JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर? राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर? राष्ट्रवादीच्या आमदारावर आरोप, धक्काबुक्कीचा व्हिडीओ व्हायरल

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदिप क्षीरसागर यांनी स्वतःच्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर काढल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

जाहिरात

जन्मदात्या बापालाच काढलं घराबाहेर?

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 21 एप्रिल : राष्ट्रवादीच्या आमदाराने वडिलांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. वडिलांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार देखील दाखल झाली आहे. बीडचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागरांविरोधात रवींद्र क्षीरसागर यांच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?   राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांचा वडिलांना धक्काबुक्की करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांच्या विरोधात पाच दिवसांपूर्वी बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एकमेकांवर धावून जाताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या

बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विरोधात बीड मधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अदाखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागरांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप क्षीरसागरंसह त्यांचे भाऊ अर्जुन क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. भारतीय दंड संगिता कलम 323, 504, 506, 34 अंतर्गत क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत. कौटुंबिक कारणावरून संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघा भावांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करून घराबाहेर काढण्याचा प्रकार घडला असल्याचे समजते. वाचा - नागपूर जिल्ह्यात निवडणुकांपूर्वीच काँग्रेस नेत्याचा बावनकुळे यांना धक्का, 18 जागा बिनविरोध स्वतः रवींद्र क्षीरसागर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली आहे. दरम्यान या घटनेनंतर बीडच्या राजकारणात एकच उडाली आहे. मात्र, पोलिसांनी याबाबत अद्यापही कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या