JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड

बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का! भावाचा बहिणीला तर काकाचा पुतण्याला छोबीपछाड

बीड जिल्ह्यातील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. सहा बाजार समिती पैकी चार बाजार समितीवर बहुमताने वर्चस्व मिळवलं आहे.

जाहिरात

बीड जिल्ह्यात आघाडीचा युतीला दे धक्का!

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 29 एप्रिल : जिल्ह्यात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने बाजी मारत जिल्ह्यातील सहापैकी पाच बाजार समितीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. तर भाजपला एकाच बाजार समितीवर समाधान मानावे लागले. बीड जिल्ह्यातील 9 पैकी सहा बाजार समितींसाठी काल मतदान झाले. यातील वडवणी बाजार समितीवर राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी एकहाती वर्चस्व मिळवले. आज पाच बाजार समितीचा निकाल लागला. यामध्ये गेवराई, परळीमध्ये 18 जागेवर राष्ट्रवादीने विजय मिळवला. तर आंबेजोगाई मध्ये 18 पैकी 15 जागा मिळवत घवघवीत यश मिळवले आहे. भाजपाला फक्त तीन जागांवर समाधान मानावे लागले.

बीडमध्ये आमदार संदीप क्षीरसागर यांनी सर्व पक्षी आघाडी करत काका माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना इतर पक्षांच्या मदतीने मात दिली. 18 पैकी पंधरा जागेवर विजय मिळवत झेंडा फडकवला तर जयदत्त क्षीरसागर यांना तीन जागेवर समाधान मानावे लागले. तर परळीमध्ये आमदार धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धक्का देत अठराच्या अठरा जागेवर वर्चस्व प्रस्थापित केले. भाजपला भोपळा देखील फोडता आला नाही. गेवराईत पुन्हा एकदा माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी गड कायम राखला. अंबाजोगाईतही आमदार धनंजय मुंडे गटाचे वर्चस्व राहिले. 18 पैकी 15 जागा महाविकास आघाडीच्या तर तीन जागा भाजपच्या आल्या. केजमध्ये भाजपचे वर्चस्व राहिले. भाजप नेते रमेश आडसकर व आमदार नमिता मुंदडा गटाचे 14 उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांचे चार उमेदवार निवडूण आले. आतापर्यंत तरी वडवणी, अंबाजोगाई, गेवराईमध्ये राष्ट्रवादीचे वर्चस्व राहिले आहे. बीड जिल्ह्यातील निकालाची परिस्थिती बीड -जयदत्त क्षीरसागर -3 सर्व पक्ष आघाडी संदीप क्षीरसागर- 15 सर्व पक्षीय आघाडीचा झेंडा. सत्ता परिवर्तन. आंबेजोगाई- महाविकास आघाडी विरुद्ध-15 भाजप-3 राष्ट्रवादी- महाविकास आघाडीचा झेंडा, सत्ता कायम वाचा - रवी राणांसह भाजपचा सुपडा साफ, भाऊही हरला; अमरावतीत काँग्रेसचा मोठा विजय परळी -राष्ट्रवादी -18 धनंजय मुंडे भाजप-0 पंकजा मुंडे राष्ट्रवादी झेंडा -सत्ता कायम गेवराई - राष्ट्रवादी महाविकास आघाडी -18 भाजप-0 राष्ट्रवादी महाविकास आघाडीचा झेंडा-सत्ता कायम वडवणी-राष्ट्रवादी-18 भाजप-0 राष्ट्रवादीचा झेंडा-सत्ता परिवर्तन

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या