JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / बीडमध्ये मोठा अपघात; मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसलं, वारकरी गंभीर जखमी

बीडमध्ये मोठा अपघात; मुक्ताईच्या पालखीत वाहन घुसलं, वारकरी गंभीर जखमी

या घटनेत महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

जाहिरात

अपघातामध्ये महिला वारकरी जखमी

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

बीड, 19 जून, सुरेश जाधव : जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. वारीमध्ये दुचाकी घुसली. या अपघातामध्ये चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. बीडच्या मोरगाव फाट्याजवळ हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुक्ताईच्या पालखीमध्ये अपघात  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, पंढरपूरच्या दिशेनं प्रवास करणाऱ्या मुक्ताईच्या पालखीमध्ये मध्यरात्री दुचाकी घुसल्यानं अपघात झाला. या घटनेत चार महिला वारकरी गंभीर जखमी झाल्या आहेत. ही घटना बीडच्या मोरगाव फाट्याजवळ घडली. गावकऱ्यांनी तातडीनं जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं आहे.

परीक्षेत आलेल्या अपयशानं खचली; विद्यार्थीनीनं आयुष्यच संपवलं, बीडमधील धक्कादायक प्रकार

संबंधित बातम्या

जखमींची प्रकृती स्थिर  अपघाताची माहिती मिळाल्यानंतर  जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी उपचाराबाबत वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या, तसेच त्यांनी स्वत: जखमी महिला वारकऱ्यांवर उपचार केले.  या वारकऱ्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉ. साबळे यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या