JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / शेतकऱ्यांचा कापूस घरातच; बीडचा शेतकरी पुन्हा संकटात

शेतकऱ्यांचा कापूस घरातच; बीडचा शेतकरी पुन्हा संकटात

बीड जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. चांगला दर मिळत नसल्यामुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरातच पडून आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 13 फेब्रुवारी : बीड जिल्ह्यातील शेतकरी हा नेहमीच सुलतानी आणि आसमानी संकटाला सामोरे जात असतो. आता जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक संकटात सापडला आहे. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी कापसाला चांगला दर मिळाल्याने यावर्षी देखील शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली होती. कापसाची तोडणी होऊन दोन ते तीन महिने उलटले आहेत. मात्र हा कापूस विक्रीसाठी न जाता शेतकऱ्यांनी त्यांच्या घरातच साठवून ठेवला आहे.

कापसाला दर नाही मागील वर्षी कापसाला भाव 11 हजार प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळाला होता. यंदा कापसाची विक्री सुरू होताच 6500 ते 8 हजार रुपये पर्यंत कापसाचा दर गेला. मात्र शेतकऱ्यांना हा दर परवडत नसल्यामुळे शेतकरी वर्गाकडून कापसाला साडेनऊ हजार ते दहा हजार प्रति क्विंटल भाव मिळावा, अशी मागणी केली जात आहे. Beed : पांढऱ्या तुरीला परराज्यातून मागणी, चांगला भाव मिळाल्यानं शेतकरी खूश, Video बाजारात केवळ 30 टक्के कापूस गेल्यावर्षीची स्थिती पाहता आतापर्यंत शेतकऱ्यांचा संपूर्ण कापूस हा विक्री व्हायला हवा होता. परंतु, आतापर्यंत केवळ 30 टक्के कापूस हा बाजारात विक्रीसाठी आला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये मोंढा परिसर व बाजार समिती परिसरामध्ये शुकशुकाट पाहायला मिळतोय. Photos : दुष्काळी भागात मिरचीचं मॅजिक, सव्वा एकरातच शेतकरी झाला लखपती जागतिक मागणी नसल्याचा फटका कापसाची आवक घटल्याने जिनिंग चालकांना देखील मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. जागतिक स्तरावरूनच जास्त प्रमाणात मागणी नसल्यामुळे कापसाचा दर वाढत नसल्याचे सांगितले जात आहे. आता कापसाला दर कधी मिळणार आणि शेतकरी कापूस विक्री घेऊन बाजारात कधी येणार याकडेच व्यापाऱ्यांचे लक्ष आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या