JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Pankaja Munde : लहान माणसांकडून काय अपेक्षा करणार? पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? गोपीनाथ गडावरुन इशारा

Pankaja Munde : लहान माणसांकडून काय अपेक्षा करणार? पंकजा मुंडे यांचा रोख कुणाकडे? गोपीनाथ गडावरुन इशारा

भाजप नेत्या पंकजा मुंडे आज गोपीनाथ गडावरील कार्यक्रमात बोलताना भावूक झालेल्या पाहायला मिळाल्या. यावेळी त्यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे.

जाहिरात

भाजप नेत्या पंकजा मुंडे

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 3 जून : दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचा आज (3 जून) नववा स्मृतिदिन आहे. त्यानिमित्त गोपीनाथ गडावर मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मी कोणासमोरही झुकणार नाही, काहीतरी द्या म्हणून पदर पसरणार नाही. जनतेसमोर पदर पसरेल. माझ्या भूमिका कोणाच्या आडून नसतात. तुम्ही धिर धरा आणि विश्वास ठेवा असं म्हणत पंकजा मुंडे भावनिक झाल्या. दरम्यान, या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी देखील हजेरी लावली होती. काय म्हणाल्या पंकजा मुंडे? “गोपीनाथ मुंडे यांचं वादळी जीवन होतं. मी वादळाची लेक आहे. इथे वादळ येणार होतं. मात्र, त्याची दिशा बदलली आहे. असं आमचं आयुष्य आहे,” असं विधान पंकजा मुंडे यांनी केलं. पुढे त्या म्हणाल्या की भगवान गडावरून पंकजा दिसते असं मुंडे साहेब महणायचे. मी थकणार नाही रुकणार नाही आणि कुणासमोर झुकणार नाही. ज्याला इशारा मिळायचा त्याला मिळतं असतो. माझी भूमिका मी हजारवेळा सांगितली आहे. पाच वर्षात ज्या राजकीय घटना घडल्या. माझ्या पक्षाने भूमिका घेतल्या. मी राजकारणात लोकासाठी आहे. शेवटच्या माणसाचं हित हीच माझी भुमिका आहे. माझ्या लोकांच्या विरोधात काही असेल तर त्यावर बोलणारे आम्ही आहोत, असं म्हणत आपल्याच पक्षाला पंकजा मुंडे यांनी इशारा दिला आहे. वाचा - Ajit Pawar : ‘मिठाचा खडा कुणी..’ आघाडीतील जागावाटपावर अजित पवार स्पष्टचं बोलले, म्हणाले.. लहान माणसांकडून काय अपेक्षा करणार? : पंकजा मुंडे मला जर भूमिका घ्यायची असेल तर तुम्हाला बोलावून बिंदास्त घेईल. कुणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार नाही. अनेक बंदुका माझ्या खांद्यावर सामवल्या आहेत. पंकजा मुंडे जी भूमिका घेईल ती छातीठोक पणे घेईल. विरोधकांमध्ये संभ्रम होण्याची संधी मी दिली नाही. अनेकांना पराभव होऊनही डझनभर आमदार केले. माझे नेते मी अमित शाहंना भेटणार. त्यांना वेळ मागितली आहे. रडगाणं गाणारी मी नाही. बाप मेला तेव्हा डोळ्यात अश्रू येवू दिले नाही. काहीजण काळजीपोटी विचारतात. लहान माणसांकडून काय अपेक्षा करणार? तुम्ही धीर धरा आणि विश्वास ठेवा, असं म्हणत पंकजा मुंडे भावनिक झाल्या. यावेळी वैद्यनाथ साखर कारखाना पूर्ववत करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या