JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Beed news: नातवासोबत आजी-आजोबाही जाणार शाळेत; पाहा कशासाठी भरणार विशेष वर्ग, Video

Beed news: नातवासोबत आजी-आजोबाही जाणार शाळेत; पाहा कशासाठी भरणार विशेष वर्ग, Video

विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून विविध उपक्रम राबविले जातात. असाच एक उपक्रम बीडमध्ये होत असून नातवासोबत आजी-आजोबाही शाळेत जाणार आहेत.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 17 फेब्रुवारी: विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून शिक्षण विभागाचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात. पाठ्यपुस्तका बरोबरच, राज्य शासन आणि जिल्ह्यातील शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना सोप्या पद्धतीने शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्नशील असतो. त्यासाठी नवनवीन स्तुत्य उपक्रमही राबविले जातात. असाच एक उपक्रम बीड जिल्ह्यातील शिक्षण विभाग राबविणार असून नातवासोबत आजी-आजोबाही शाळेत जाणार आहेत.

आजी-आजोबा आणि नातवाचं खास नातं आजी- आजोबा व नातवाच्या नात्यातील वीण अतिशय घट्ट असते. ते एकमेकांचे मित्र देखील असतात. आई-वडिलांपेक्षा आजी-आजोबांच्या सहवासातच नातवंडं वाढत असतात. त्यामुळे त्यांचे बॉंडिंग चांगले असते. हीच बाब लक्षात घेऊन राज्य शासनाच्या निर्णयानुसार बीड जिल्ह्यातील प्रत्येक शाळेमध्ये नातवांसोबत आजी आजोबा देखील शाळेमध्ये जाणार आहेत. ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे बीडचे डॉक्टर गुरूजी, Video आजी आजोबा दिवस साजरा करणार जिल्ह्यातील शिक्षण विभागाकडून पितृ पूजन, कन्या दिन, रक्षाबंधन, सांस्कृतिक दिवस असे उपक्रम साजरे केले जातात. आता मुलांची आजी आजोबांशी असणाऱ्या नात्याची वीण आणखी घट्ट करण्यासाठी आजी आजोबा दिवस साजरा करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हास्तरावर राबवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शाळांमध्ये पाठ्यपुस्तकातील शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक मूल्य रुजविण्यासाठी तसेच मानसिक आरोग्याच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी सांगितले. HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे ‘तिसऱ्या डोळ्या’चा वॉच, Video कसा असणार आजी - आजोबा दिवस? शाळेबरोबरच आजी - आजोबांच्या महत्त्वपूर्ण नात्याची नव्याने ओळख व दृढता व्हावी हा या उपक्रमाचा उद्देश आहे. यावर्षीपासून सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या सोमवार नंतर येणाऱ्या रविवारी आजी आजोबा दिवस साजरा केला जाणार आहे. या उपक्रमात नातवासोबत आजी-आजोबांनी शाळेत यायचे आहे. तसेच मुलांशी संवाद साधत संस्कृतिक कार्यक्रम, गोष्टी, वादन, चित्रकला, संगीत खुर्ची असे कार्यक्रम या उपक्रमात असणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या