रोहित देशपांडे, प्रतिनिधी
बीड, 13 फेब्रुवारी: आपल्याकडे 'वाचाल तर वाचाल' सारख्या म्हणी वापरल्या जातात. पण पुस्तक वाचने हा प्रकार सध्या खूप कमी झाल्याचे दिसते.त्यातच इंटरनेटच्या युगामध्ये विद्यार्थी देखील सर्वाधिक मोबाईलचा वापर करतात. त्यामुळे कुठेतरी वाचन संस्कृती संपुष्टात आल्याचे दिसून येते. मात्र ही वाचन संस्कृती आजही गावागावात रुजावी म्हणून बीड येथील डॉ. मनीषा उगलमुगले यांनी अनोखा उपक्रम सुरू केला आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी
बीड येथील डॉ. मनीषा उगलमुगले यांनी वैद्यकीय पेशा सांभाळत स्वतःची वाचनाची आवड जोपासली आहे. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांतही वाचनाची गोडी निर्माण व्हावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी त्या ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेला भेट देतात. त्यांच्याकडे असणारी पुस्तके विद्यार्थ्यांना देऊन ती वाचून घेतात. त्यांच्या या अभिनव उपक्रमाला विद्यार्थीही चांगला प्रतिसाद देत असतात.
HSC Exam 2023: कॉपी बहाद्दर सावधान! परीक्षा केंद्रावर आहे 'तिसऱ्या डोळ्या'चा वॉच, Video
पिंपळवाडीतून सुरुवात
डॉ. उगलमुगले यांनी आपल्या अभिनव उपक्रमाची सुरुवात पिंपळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेपासून केली. दररोज परिपाठाच्या वेळेमध्ये त्या शाळेत पोहोचत आणि विद्यार्थ्यांकडून गोष्टी, इतिहास, इंग्रजी, हिंदी अशा पुस्तकांचे वाचन करून घेत. चौथी ते सातवीच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थी ही पुस्तके आवडीने वाचतात.
नगरसेवकच झाले शिक्षक; पहिलाच तास थेट नदीवर, Video
वाचन संस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्न
डॉ. उगलमुगले यांच्याकडे दोन हजार पुस्तके आहेत. आतापर्यंत दोन शाळेत उपक्रमाची सुरुवात केली आहे. वेळेनुसार जिल्ह्यातील सर्वच ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी त्या प्रयत्न करत आहेत. "गाव खेड्यात वाचन संस्कृती रुजणे महत्त्वाचे असून यामध्ये मुलांकडून गोष्टी, सामुदायिक वाचन, बोधकथा, आत्मचरित्र, मानव विकास, विज्ञान, काल्पनिक कथा, वाचन करून घेत आहे आणि हा उपक्रम जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेमध्ये राबवणार आहे," असे डॉ. मनीषा उगलमुगले सांगतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.