बीड, 28 मार्च : कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे बीड (Beed Lockdown) जिल्हा प्रशासनाने 10 दिवसांचा कडक लॉकडाउन लावला आहे. पण असताना शहरात विनाकारण फिरण्यार्यांची काही कमी नाही. अशा या हौशी तरुणांना पोलीस प्रशासनाकडून (Beed Police) चांगलाच चोप देण्यात आला. काही कारण नसतांना विनाकारण बाहेर पडणं या तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे. शहरातील खासबाग, बशीरगंज ,शिवाजी महाराज चौक यासह अनेक भागात हौशी तरुण मंडळी विनाकारण दुचाकीवर बाहेर फिरत होती. याच विनाकारण फिरणाऱ्यांना काठीचा काठीचा प्रसाद मिळाला.
तर यामुळे काही वेळातच शहरातील विनाकारण फिरणारी मंडळी कमी झाली होती. दरम्यान, संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर सध्या पोलीस अधीक्षक आर.राजास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली, बीड शहरासह जिल्ह्यात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. चाचणी करूनच जिल्ह्यात प्रवेश! जिल्ह्याच्या सर्व सीमांवर 9 चेक पोस्ट उभारण्यात आले आहेत. जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांच्या कोविड चाचणीची माहिती घेत त्यांचे टेम्प्रेचर तपासले जात आहे. यासाठी शिक्षक आरोग्य कर्मचारी आणि पोलिस प्रशासनाची मदत घेतली जात आहे. नागरिकांनी बंद असल्याने घराबाहेर येण्याचे टाळले असून आरोग्याच्या आणि शेतीच्या कामासाठी फक्त बाहेर पडत आहेत. जिल्ह्यातून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या बस गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. तसंच खाजगी वाहतुकही पूर्णतः बंद करण्यात आली आहे. दरम्यान, जिल्ह्याच्या सीमांवर कडक बंदोबस्त असून अँटीजन टेस्ट करणाऱ्या नागरिकांनाचं जिल्ह्यात प्रवेश दिला जातोय. सेवा निवृत्तीनंतर कुत्रे आणि घोड्यांना ‘हा’ देश देणार पेन्शन ऊस तोडणीचा हंगाम पूर्ण झाल्यानंतर परतणाऱ्या ऊसतोड मजुरांचे जिल्ह्याच्या सीमेवर स्कॅनिंग करून त्यांना प्रवेश दिला जात असून गावामध्ये आल्यानंतर कॉरंटाइन करण्यासंदर्भात देखील सूचना दिल्या जात आहेत. जिल्ह्यात तब्बल तीन ते साडेतीन लाख ऊसतोड मजूर बाहेर ऊसतोडणीसाठी जात असतात. हंगाम संपल्यानंतर आता ते घराकडे परतत आहेत. यातच कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा प्रशासन करत आहे.