JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीची भरारी, दिग्गजांना मागं टाकत रचला इतिहास, Video

Aurangabad News : राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या साक्षीची भरारी, दिग्गजांना मागं टाकत रचला इतिहास, Video

नुकत्याच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूनं दमदार कामगिरी केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

सुशील राऊत, प्रतिनिधी औरंगाबाद, 21 फेब्रुवारी : तामिळनाडूमधील कोईमतूरमध्ये नुकत्याच झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेत औरंगाबादच्या खेळाडूनं दमदार कामगिरी केली आहे. या स्पर्धेत औरंगाबादची वूमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगेंन 2 ब्रॉन्झ मेडलची कमाई केली. 14 पैकी 10 पॉईंट्स मिळवत तिनं हे यश मिळवलंय. औरंगाबादचं नाव बुद्धीबळाच्या नकाशावर ठळकपणे नेणारी साक्षी कोण आहे ते पाहूया घरातून पाठिंबा औरंगाबाद शहरातील गाडखेडा परिसरामध्ये राहणारी साक्षीचे वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. ते देखील बुद्धीबळ स्पर्धा खेळतात. त्यामुळे साक्षीला घरातूनच बुद्धीबळासाठी पाठिंबा आणि शिक्षण मिळतं. शहरातील सरस्वती भवन महाविद्यालयात शिकणाऱ्या साक्षीनं यापूर्वीही वेगवेगळ्या स्पर्धा गाजवल्या आहेत. नाशिकच्या तरुणानं केली आधुनिक ड्रोनची निर्मिती, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा, Video कोईमतुर येथे झालेल्या महिलांच्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये वुमन इंटरनॅशनल मास्टर साक्षी चितलांगे सहभागी झाली होती. या स्पर्धेत देशभरातील मातब्बर खेळाडूंचं तगडं आव्हान साक्षीपुढं होतं. तीन इंटरनॅशनल मास्टर आणि तीन वुमन ग्रँडमास्टरही या स्पर्धेत सहभागी होत्या. या सर्वांच्या उपस्थितीमध्ये साक्षीनं हे यश मिळवलंय. सांघिक कामगिरी दमदार… साक्षीकडं या स्पर्धेत महाराष्ट्राच्या टीमचं नेतृत्त्व होतं. तिनं कर्णधार म्हणूनही उत्तम कामगिरी बजावली.  वुमन इंटरनॅशनल मास्टर आशना मकीजा पाच  पॉईंट्स, वुमन फिडे आणि मास्टर भाग्यश्री पाटील चार पॉईंट्स, मृदुल देहाणकर 3.5 गुण, आणि विश्वा शहा एक पॉईंट यांच्या मदतीनं साक्षीनं टीमला ब्रॉन्झ मेडल जिंकून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. बीडच्या तरूणाला जगप्रसिद्ध फेलोशिप, ZP शाळा ते इटली केला प्रवास Video यापूर्वी वेगवेगळ्या स्पर्धा जिंकून माझे तीन नॉम्स पूर्ण झालेले आहेत. आता माझी लायबिलिटी टू टू फोर वन अशी आहे. माझ्या स्वतःच्या बळावर मी इंटरनॅशनल वुमन टायटल पूर्ण करणार आहे, असा विश्वास साक्षीनं यावेळी बोलताना व्यक्त केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या