रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 18 फेब्रुवारी: जिद्द, चिकाटी, आणि इच्छाशक्ती असेल तर माणूस नक्की यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो. आपल्या कर्तृत्वाने देशाचे नाव रोशन करणारे अनेक तरुणांची उदाहरणे आपण ऐकली असतील. बीड जिल्ह्यातील तरुणही दिवस रात्र मेहनत करत आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत आहेत. अशाच एका तरुणाला जगभरात प्रतिष्ठित मानली जाणारी मेरी क्युरी फेलोशिप मिळाली आहे. डॉ. महेश नागरगोजे असे या तरुणाचे नाव आहे.
‘ब्रेन स्ट्रोक’वर करणार संशोधन डॉ. महेश नागरगोजे हे मुळचे पाटोदा तालुक्यातील रोहतवाडी येथील आहेत. त्यांना डॉ. मेरी क्युरी ही जगप्रसिद्ध फेलोशिप नुकतीच मंजूर झाली आहे. या फेलोशिपच्या माध्यमातून पुढील दोन वर्ष ते इटलीमध्ये ‘ब्रेन स्ट्रोक’वर संशोधन करणार आहेत. आपल्या कर्तृत्वाच्या बळावर रोहतवाडी गावातून इटलीपर्यंतचा प्रवास करणाऱ्या डॉ. नागरगोजे या तरुण संशोधकाचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागात वाचन संस्कृतीचा प्रसार करणारे बीडचे डॉक्टर गुरूजी, Video जि. प. शाळा ते इटलीपर्यंतचा प्रवास डॉ. महेश नागरगोजे यांचे प्राथमिक शिक्षण रोहतवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यानंतर पाटोदा येथील पी व्ही पी कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. कोल्हापुरातील डी वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एम.ई. केमिकल केले. तर त्यानंतर प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या आयआयटी गुवाहाटी येथे डॉक्टरेट पूर्ण केली. गृहिणीनं 42 व्या वर्षी सुरू केला व्यवसाय, घरातूनच करतीय लाखोंची कमाई, Video पीएचडी संशोधनासाठी त्यांनी ‘ब्रेन स्ट्रोक’वर अभ्यास केला. त्यासाठीच त्यांना डॉ. मेरी क्युरी मध्ये रिसर्च फेलोशिप मिळाली आहे. आता दोन वर्षासाठी त्यांना 1 कोटी 70 लाख रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. या यशाबद्दल डॉ. नागरगोजे यांचं कौतुक होत आहे.

)







