JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / औरंगाबादेत मध्यरात्री चोर-पोलिसांच्या पाठलागाचा थरार; अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्याच

औरंगाबादेत मध्यरात्री चोर-पोलिसांच्या पाठलागाचा थरार; अखेर आरोपींच्या मुसक्या आवळल्याच

औरंगाबाद जिल्ह्यात रोडवर शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अखेर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे.

जाहिरात

प्रतिकात्मक छायाचित्र

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

औरंगाबाद, 26 फेब्रुवारी, अविनाश कानडजे : औरंगाबाद जिल्ह्यात रोडवर शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अखेर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी कारवाई करत पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र या चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अंधारांचा फायदा घेऊन फरार झाले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दोन किलोमिटरपर्यंत चोरट्यांचा पाठलाग घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील शिवराई रोडवर लग्नावरून घरी परतत असलेल्या दोन दाम्पत्यांना अडवून लुटण्यात आले होते. त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी थरारक कारवाई पोलिसांनी केली. पोलिसांनी आरोपींचा दोन किलोमिटरपर्यंत पाठलाग करत त्यांना अटक केली. मात्र यातील दोघे अंधाराचा फायदे घेत फरार झाले. पोलिसांकडून आता फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

नव्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराचं पहिल्या प्रेयसीसोबत धक्कादायक कांड

संबंधित बातम्या

नाकेबंदी करून आवळल्या मुसक्या पोलिसांनी या चोरांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी कोली होती. पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मनिष कलवानीया वायरलेसवरून पोलिसांना सूचना देत कारवाईचं अपडेट घेत होते. अखेर या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या