मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /नव्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराचं पहिल्या प्रेयसीसोबत धक्कादायक कांड

नव्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराचं पहिल्या प्रेयसीसोबत धक्कादायक कांड

जितेंद्र वर्माला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची नाराजी दूर करण्यासाठी आरोपीने ही घटना घडवली.

जितेंद्र वर्माला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची नाराजी दूर करण्यासाठी आरोपीने ही घटना घडवली.

जितेंद्र वर्माला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची नाराजी दूर करण्यासाठी आरोपीने ही घटना घडवली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

रायपूर 25 फेब्रुवारी : प्रेमात माणूस आंधळा होतो, असं म्हणतात. प्रेमासाठी एखादी व्यक्ती काय करू शकते, याचाच प्रत्यय देणारी एक भयानक घटना नुकतीच समोर आली आहे. यात छत्तीसगडच्या दुर्ग जिल्हा पोलिसांना एका महिलेच्या हत्येचं गूढ उकलण्यात यश आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तो महिलेचा प्रियकर निघाला आहे. दुसऱ्या गर्लफ्रेंडची नाराजी पाहून आरोपीने पहिल्या प्रेयसीला कट रचून ठार मारलं. पण, पोलिसांच्या तपासात आरोपी पकडला गेला.

नवऱ्याला सोडलं, 12 वर्षांनी लहान मुलासोबत प्रेम, मग तिसऱ्यासोबतच रिलेशन, महिलेचा वेदनादायी अंत

विशेष म्हणजे 23 फेब्रुवारीला दुर्ग जिल्ह्यातील धौर खार परिसरात एका शेतात महिलेचा जळालेला आणि अर्धनग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. प्रथमदर्शनी हे संपूर्ण प्रकरण बलात्कार आणि हत्येचं असल्याचं दिसलं. तपासात पोलिसांनी महिलेचं नाव मधु बाळा जांगडे असून ती घसीदास नगर भिलाई येथील रहिवासी असल्याचं सांगितलं, ती चहाची टपरी चालवायची.

मृत महिलेचे राजीव नगर येथील रहिवासी जितेंद्र वर्मा याच्याशी प्रेमसंबंध असल्याचंही तपासात निष्पन्न झालं. यानंतर जितेंद्र वर्माला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने खुनाची कबुली दिली. आपल्या दुसऱ्या गर्लफ्रेंडची नाराजी दूर करण्यासाठी आरोपीने ही घटना घडवली. सुनियोजित पध्दतीने त्याने २० फेब्रुवारी रोजी महिलेला आपल्या स्कूटीवर बसवलं आणि फिरायला जाण्याच्या बहाण्याने शेतात नेलं. तिथे तिच्या संमतीने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर तिचा गळा दाबून खून करण्यात आला.

वडिलांना संपवण्यासाठी मंगळसुत्र विकलं, मुलाच्या क्रुर प्लानमध्ये आईनंही दिली साथ आणि मग...

याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर खुनाच्या कलमान्वये कारवाई करण्यात येत आहे. प्राथमिक तपासात पोलिसांना या प्रकरणाशी संबंधित कोणताही सुगावा लागला नाही. पण, अखेर हळूहळू पोलिसांना अनेक सुगावे लागले, त्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Murder news