शेताचा बांध कोरला म्हणून आरोपींनी मृत युवकासोबत भांडण करून दोघांमध्ये हाणामारी झाली होती
अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात इथं एक धक्कादायक घटना समोर आली आहे. हाणामारीचा अपमान सहन न झाल्याने एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पाचोर पोलीस ठाण्यात चौघा जणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पैठण तालुक्यातील होनोबाचीवाडी इथं ही धक्कादायक घटना समोर आली आहे. मारहाणीचा अपमान सहन न झाल्यामुळे एका 20 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. गौरव विजयदास वैष्णव असे मृताचे नाव आहे. तर उदल किसन महेर, किसन काळू महेर, वंदना पुनम महेर आणि पुनम किसन महेर असे आरोपींची नावं आहे. (प्रेम, लिव्ह-इन अन् धोका, हत्येच्या दिवशीच प्रियकराचं लग्न, लव्ह स्टोरीचा धक्कादायक शेवट!) ही घटना 5 फेब्रुवारीला घडली असून, याप्रकरणी सोमवारी सायंकाळी चार जणांविरुद्ध पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (दारू पिऊन आला तरी बायकोकडे 50 रुपये मागितले, नकार दिल्यावर घडलं भयानक) शेताचा बांध कोरला म्हणून आरोपींनी मृत युवकासोबत भांडण करून दोघांमध्ये हाणामारी झाली होती. त्या मारहाणीचा अपमान सहन न झाल्याने गौरव वैष्णव याने आत्महत्या केल्याची तक्रार मृत युवकाच्या भावाने पाचवड पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. शेत जमिनीच्या वादातून पोलीस जवानाची निर्घृण हत्या दरम्यान, गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील शिरोली/महागाव येथील शेत जमिनीच्या वादावरून एका पोलिस जवानाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेत मृतकाचे वडील गंभीररित्या जखमी झाले आहे. विलास रामदास मस्के, (वय 41 वर्षे) असे मृतक पोलीस जवानाचे नाव आहे. मृतक हा नवेगावबांध येथे पोलीस दलातील सी 60 मध्ये कार्यरत होता. तर त्यांचे वडील रामदास मस्के, वय 72 वर्षे हे गंभीर रित्या जखमी असून त्यांच्यावर अर्जुनी-मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.