JOIN US
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Chatrapati Sambhajinagar : बाप जीव द्यायला निघाला, 13 वर्षांच्या लेकीनं पाहिलं आणि..., संभाजीनगरमधील घटना

Chatrapati Sambhajinagar : बाप जीव द्यायला निघाला, 13 वर्षांच्या लेकीनं पाहिलं आणि..., संभाजीनगरमधील घटना

वडील टोकाचे पाऊल उचलत असल्याची चाहूल लागताच 13 वर्षीय चिमुकलीने प्रसंगावधान बाळगुन वडिलांचा जीव वाचवला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर) : छत्रपती संभाजीनगरमध्ये एक आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. वडील आत्महत्या करत असल्याची चाहूल लागताच 13 वर्षीय चिमुकलीने प्रसंगावधान बाळगुन वडिलांचा जीव वाचवला आहे. ही घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव या भागत घडली आहे. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी जात त्या व्यक्तीला आत्महत्या करण्यापासून रोखेल आहे. दरम्यान या मुलीच्या समयसुचकतेमुळे पोलिसांनाही आश्चर्याने भारावल्याचे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती  संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावात 13 वर्षाच्या चिमुकलीने सोयगावात तिच्या वडिलांचे प्राण वाचवले आहेत. वडील आत्महत्या करत असल्याचे समजताच तिने पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली.

नव्या गर्लफ्रेंडला खुश करण्यासाठी गाठला क्रूरतेचा कळस; प्रियकराचं पहिल्या प्रेयसीसोबत धक्कादायक कांड

संबंधित बातम्या

ती म्हणाली की, “माझे वडील आत्महत्या करत आहेत तुम्ही वेळ न घालवता तात्काळ चला” अशी विनवणी करत पोलिसांना आपल्या घरी घेऊन गेली. त्यावेळेस पोलिसांना या चिमुकलीचे वडील घराच्या बाल्कनीमध्ये दोरीच्या साह्याने गळफास घेत असल्याचे आढळून आले.  

शेवगावच्या साखर कारखान्यात भीषण स्फोट; 70 कामगार अडकल्याची भीती

पोलिसांनी गळफास घेतलेला दोर कापला आणि चिमुकलीच्या जन्मदात्याचे प्राण वाचवण्यात पोलिसांना यश आले. 13 वर्षीय चिमुकलीची समयसूचकता पाहून पोलीसही भारावले. या चिमुकलीचे वडील आत्महत्या का करत होते हे मात्र अजून अस्पष्ट आहे. दरम्यान या चिमुकलीने केलेल्या धाडसी कृत्यामुळे तिच्या वडिलांचा जीव वाचला आहे. याचबरोबर तिच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या